या गोष्टी शेअर करु नका,अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते

या गोष्टी शेअर करु नका,अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते Do not share these things,otherwise you may be deceived

आपला पिन नंबर ,सीव्हीव्ही नंबर ,ओटीपी आणि एटीएम नंबर कोणाबरोबरही शेअर करु नका , असे केल्यास आपली फसवणूक होऊ शकते – सायबर क्राईम ब्रँच

नवी दिल्ली :बँका आपल्या ग्राहकांना वेळोवेळी अलर्ट करत असतात . देशात आधीच कोरोनाचे संकट आहे .त्यामुळे देशात आँनलाईन पेमेंटसाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जात आहे.मात्र या डिजीटल पेमेंटमुळे देशात ऑनलाइन फ्रॉडचा धोकाही वाढत आहे .बँकेने आपल्या ग्राहकांना बँका सतर्क करत आहेेत .बँकांद्वारे याबाबत सतत माहिती दिला जातेेे आहे . याआधीही केंद्र सरकारने सुद्धा नोटीफिकेशन जारी करत सामान्य जनता आणि संस्थांना मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता वर्तविली होती .

आपल्या डिजीटल व्यवहारांची माहिती मिळवून फसवणूक करण्यासाठी अनेक फ्रॉड करणारे तयारच आहेत . त्यामुळे नेहमी सतर्क राहा , फसवणूक करणार्‍या फोन कॉल आणि एसएमएस यांच्या भूलथापांवर विश्वास ठेऊ नका ,असे बँकांनी कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: