माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते नारायण चिंचोली येथे सूर्यनारायणाची महापूजा संपन्न

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते नारायण चिंचोली येथे सूर्यनारायणाची महापूजा संपन्न

नारायण चिंचोली सूर्यनारायण यात्रेला उत्साह; परिचारक यांच्या हस्ते विधीवत महापूजा

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे असणाऱ्या ग्रामदैवत श्री सूर्यनारायण देवाची वार्षिक यात्रा सध्या उत्साहात सुरू आहे.पौष महिन्यातील दुसऱ्या रविवारी यात्रेच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते विधीवत महापूजा संपन्न झाली.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अँड.वामन माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने,भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण धनवडे, दिलीप चव्हाण,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माऊली हळनवर, देगावचे सरपंच संजय घाडगे, तुंगतचे माजी सरपंच अंगतराव रणदिवे, ईश्वर वटारचे सरपंच नारायण देशमुख, नारायण चिंचोलीचे उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, सूर्यनारायण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय मस्के,तंटामुक्त अध्यक्ष विजय कोळेकर आदी उपस्थित होते.
नारायण चिंचोली येथे महाराष्ट्रातील एकमेव असे पुरातन हेमाडपंथी सूर्यनारायण मंदिर असून येथे पौष महिन्यात संपूर्ण महिनाभर मोठी यात्रा भरते.या यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

यात्रा काळात भाविक भक्तांसाठी पिण्याचे पाणी, महाप्रसाद, आरोग्यसेवा व इतर मूलभूत सुविधा सूर्यनारायण देवस्थान ट्रस्ट,ग्रामस्थ व ग्राम प्रशासना च्यावतीने पुरविल्या जात आहेत.यात्रा सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी माजी सरपंच बळवंत धनवडे, विठ्ठल माने,ग्रामसेवक संतोष गायकवाड, नितीन मस्के,विष्णू माने,शिवलिंग हिंगमिरे,आप्पासाहेब वाघमोडे,संचालक बापूराव कोले, ज्ञानेश्वर बर्डे,शिवाजी वसेकर, रमेश नाझरकर, मुकुंद घाडगे, पोपट पाटील, हरिभाऊ माने, महेश माने, जनार्दन कंधारे, हनुमंत खरात, श्रीधर कोळेकर, ज्ञानेश्वर मस्के, हनुमंत गुंड, सुनील माने आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे ग्रामदैवत सूर्यनारायण देवाच्या यात्रेनिमित्त माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते विधीवत महापूजा संपन्न झाली.

Leave a Reply

Back To Top