कामात हलगर्जी करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी करणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
वानवडी सामूहिक बलात्कार घटनेतील आरोपीं रेल्वे कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करून रेल्वे स्थानक सीसीटीव्ही कक्षप्रमुख तसेच कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना आश्वासन Union Minister of State for Railways Raosaheb Danve to probe negligence of railway officials
पुणे, दि.०८ /०९/२०२१ : वानवडी सामूहिक बलात्कार घटनेसंदर्भात पीडित मुलीच्या कुटुंबियांशी, तिच्या वडीलांशी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांना दिलासा दिला. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करून पुढील मागण्या केल्या आहेत. यात
● केवळ दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना निलंबित करणे पुरेसे नाही तर सीसीटीव्ही वरती ऑनलाईन देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती ते त्या कर्मचाऱ्यांचे प्रमुख अधिकारी आहेत त्यांची चौकशी व त्याचबरोबर रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयात पीडित मुलीला घेऊन गेल्याचे दिसल्यावर सुद्धा ज्यांनी कानाडोळा केला अशा अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशा प्रकारचा विनंती श्री दानवे यांना डॉ.गोऱ्हे यांनी केली ती श्री दानवे यांनी मान्य केली आहे.
● तसेच रेल्वे महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या बैठका डॉ.गोऱ्हे यांनी घेतलेल्या होत्या. विशेषत ठाणे, कल्याण भागात होणारी दगडफेक किंवा साताऱ्यामध्ये एका अल्पवयीन मुलीला ढकलून देण्यात आलो होतो, त्या सगळ्या घटनांचा संदर्भातील निवेदन आणि त्याबद्दल वेळोवेळी महाराष्ट्राचे रेल्वे पोलीस आणि केंद्रीय रेल्वे पोलीस यांच्या प्रमुख यांना ज्या सूचना आणि निर्देश दिले होते. त्याबद्दल सुद्धा माहिती आणि त्या निवेदनाचा अहवाल श्री दानवे यांना डॉ.गोऱ्हे पाठवणार आहेत जेणेकरून एकूण महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये अजून काही कृती कार्यक्रम हाती घेता येऊ शकेल.
● पुणे शहरात अशा घटना घडू नये यासाठी रेल्वे पोलीस, महाराष्ट्र पोलीस स्थानिक कर्मचारी आणि नागरिक यांच्यासमवेत संयुक्त कार्यक्रम राबवून प्रतिबंधात्मक योजना राबविण्यात यावी अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस प्रशासनास पत्रकार परिषदेत दिल्या आहेत.
● लवकरात लवकर चार्जशीट दखल करण्यासाठी पोलीस प्रशासन सूचना केले असल्याचे देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
● काही आरोपी पॅरोलवर सुटले आहेत अशा आरोपींवर नजर ठेवण्यात यावी. अशा घटना जलदगती न्यायालयात चालून पीडितेला न्याय देण्यासाठी उचित कार्यवाही करण्याची सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनास केली आहे.