रमजाननिमित्त अभिजीत पाटील यांच्यावतीने इफ्तार पार्टीचे पंढरपुरात आयोजन

रमजाननिमित्त अभिजीत पाटील यांच्यावतीने इफ्तार पार्टीचे पंढरपुरात आयोजन

हिंदू-मुस्लिम समाजाकडून पाटील यांचे कौतुक

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये स्टेशन मज्जिद,बडा कब्रस्तान याठिकाणी रमजाननिमित्त इफ्तार पार्टींचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक कार्यात पाटील हे नेहमीच अग्रेसर असतात.सर्वधर्म समभाव हा त्यांच्या कार्याचा स्थायीभाव आहे, हे पुन्हा एकदा त्यांच्या या उपक्रमातून सिद्ध झाले.रमजान महिन्यात इफ्तार पार्टी निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना भेटून अभिजीत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील,काँग्रेसचे नितीन नागणे,जेष्ठ बजरंग बागल, नागनाथ अधटराव,ॲड. यासिन शेख,महंमदभाई लिगाडे,माजी नगरसेवक शुकुर बागवान, युसूफ मुजावर, अरीफ बेळगांवकर,समीर मुलाणी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नेते सुधीर भोसले, देगाव ग्रामपंचायत सदस्य आनंद पाटील, विठ्ठल कारखान्याचे संचालक गणेश ननवरे, दत्तात्रय नरसाळे, उमेश मोरे, डिव्हीपी बॅकेचे संचालक परवेज मुजावर यासह आदी हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *