आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाडमध्ये प्रिशा यादवची देशपातळीवर निवड; पंढरपूर तालुक्याचे नाव उज्ज्वल

आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाडमध्ये प्रिशा यादवची देशपातळीवर निवड; पंढरपूर तालुक्याचे नाव उज्ज्वल

नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड स्पर्धेत सरकोली ता. पंढरपूर येथील प्रिशा प्रमोद यादव हिची देशपातळीवर निवड झाली असून पुरस्कार वितरणासाठी तिला दिल्ली येथे निमंत्रित करण्यात आले होते.

नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड स्पर्धेत सरकोली ता.पंढरपूर महाराष्ट्र येथील प्रिशा प्रमोद यादव हिची देशपातळीवर निवड झाली असून पुरस्कार वितरणासाठी तिला दिल्ली येथे निमंत्रित करण्यात आले होते.यामुळे पंढरपूर तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.

हिंदी विकास संस्थान,दिल्ली यांच्यावतीने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय हिंदी सन्मान समारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रम दि.२९ व ३० जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालय तीन मूर्ती भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या समारंभासाठी देश-विदेशातील हिंदीप्रेमी,विद्वान, साहित्यिक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात प्रिशा यादव हिला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.पुरस्कार स्वीकारताना प्रिशाने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच सिटी प्राइड रावेत पुणे येथील शिक्षकांनी दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाला दिले. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य दिशा आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाल्याचे तिने नमूद केले.

प्रिशाच्या या यशाबद्दल सरकोली गावासह पंढरपूर तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध स्तरांतून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.

Leave a Reply

Back To Top