एसटी प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य; महिला,ज्येष्ठ नागरिकांसाठी नवे नियम लागू
NCMC कार्डशिवाय एसटी सवलत बंद ? परिवहनमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा इशारा
महाराष्ट्रात एसटी बस प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत वयस्कर आणि विद्यार्थ्यांसाठी कार्डची प्रक्रिया, शुल्क, कागदपत्रे आणि परिवहनमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिलेला इशारा जाणून घ्या
एसटी बससाठी NCMC कार्ड आता अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत वयस्कर यांच्यासाठी महत्त्वाची माहिती
मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज –महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) विविध सवलतीच्या योजना आणि मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी आता NCMC (National Common Mobility Card) अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहनमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला असून राज्यभरात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

NCMC कार्ड म्हणजे काय ?
NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. हे एक डिजिटल स्मार्ट कार्ड असून त्याद्वारे एसटी तिकीट,सवलतीची नोंद, रोखविरहित व्यवहार आणि प्रवाशांची माहिती एकाच प्रणालीत उपलब्ध होणार आहे.
कोणासाठी हे कार्ड आवश्यक आहे ?
खालील प्रवाशांना आता NCMC कार्ड आवश्यक असेल: महिला सन्मान योजनेतील महिला प्रवासी,
65 ते 75 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक
75 वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिक.
योजनेतील प्रवासी- विद्यार्थी,दिव्यांग प्रवासी,स्वातंत्र्यसैनिक,अधिस्वीकृतीधारक पत्रकार,राज्यस्तरीय पुरस्कार विजेते,
इतर सवलतधारक प्रवासी.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणती सवलत ?
महिला सन्मान योजना-महिलांना एसटी प्रवासात 50% तिकीट सवलत मिळते.
ज्येष्ठ नागरिक योजना-65 ते 75 वर्षे वयोगट: 50% सवलत.
75 वर्षांवरील नागरिक : मोफत प्रवास (अमृत ज्येष्ठ नागरिक योजना)

कार्ड मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ?
महिलांसाठी – आधार कार्ड,मोबाईल नंबर.
ज्येष्ठ नागरिकांसाठी- आधार कार्ड,जन्म तारीख पुरावा.
विद्यार्थ्यांसाठी -शाळा/कॉलेज आयडी,
सरल क्रमांक.
दिव्यांगांसाठी-UDID क्रमांक किंवा दिव्यांग प्रमाणपत्र .
NCMC कार्ड कोठे उपलब्ध आहे ?
कार्ड नोंदणी खालील ठिकाणी सुरू आहे:
एसटी बस स्थानके,आगार कार्यालये,
अधिकृत नोंदणी केंद्रे,नियुक्त एजंट,
काही ठिकाणी तालुकास्तरीय ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयातही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
राज्यात 3000 पेक्षा अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय ?
जवळच्या एसटी आगार किंवा नोंदणी केंद्रात जा.आधार व आवश्यक कागदपत्रे जमा करा.फोटो व मोबाईल नंबर नोंदवा.
शुल्क भरा,अर्ज मंजूर झाल्यानंतर कार्ड दिले जाईल.
कार्डची फी किती ?
नवीन कार्ड: ₹199 (GST सह)
जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास: ₹149
किमान वॉलेट बॅलन्स: ₹100 आवश्यक
50 रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार.
रिचार्ज कसे करायचे ?
NCMC कार्ड खालील माध्यमातून रिचार्ज करता येणार : ETIM मशीन,अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप,अधिकृत एजंट.
प्रतापराव सरनाईक यांनी काय सांगितले?
परिवहनमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सांगितले की, हा निर्णय केवळ तांत्रिक बदल नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे.यामुळे
रोखविरहित व्यवहार वाढतील
सवलतींची अचूक नोंद होईल
आर्थिक व्यवहारात पारदर्शकता येईल
तिकिटासाठी सुट्ट्या पैशांचा त्रास कमी होईल.
कोणावर कारवाई होणार ?
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की:
NCMC कार्ड नसल्यास सवलतीचा लाभ नाकारला जाऊ शकतो.पूर्ण तिकीट आकारले जाऊ शकते.जादा दराने कार्ड विक्री करणाऱ्या एजंटवर कारवाई होणार
संबंधित एजंट किंवा केंद्राचा परवाना रद्द केला जाऊ शकतो.

