त्या महिलेच्या कुटुंबियांना रिपब्लिकन पक्षातर्फे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली 1 लाखांची सांत्वनपर मदत

साकिनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील बळीत महिलेच्या कुटुंबियांना रिपब्लिकन पक्षातर्फे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली 1 लाखांची सांत्वनपर मदत Union Minister of State Ramdas Athawale on behalf of the Republican Party offered Rs 1 lakh to the victim’s family.
 मुंबई दि. 20 -  साकिनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील बळीत महिलेच्या कुटुंबियांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेऊन रिपाइंतर्फे 1 लाख रुपयांची सांत्वनपर मदत दिली.

साकिनाका उदयनगर येथील बळीत महिलेच्या  निवासस्थानी जाऊन ना रामदास आठवले यांनी ही सांत्वनपर आर्थिक मदत दिली. यावेळी बळीत महिलेची आई आणि दोन मुली उपस्थित होत्या. तसेच रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, साधू कटके,विवेक पवार, लखमेन्द्र खुराणा,दादासाहेब भोसले,जयंतीभाई गडा,बापू प्रधान आदी उपस्थित होते.

 साकिनाका येथे महिलेची दि.10 सप्टेंबर रोजी बलात्कार करून निर्घृण हत्या झाल्याचा अमानुष गुन्हा घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी चांगली कामगिरी करून आरोपीला त्वरित अटक केली. या प्रकरणी ऍट्रोसिटी  कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असल्याने बळीत महिलेच्या कुटुंबियांना समाज कल्याण खात्यातर्फे 8 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.

राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री फंडातून 20 लाख रुपये बळीतेच्या कुटुंबियांना देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असली तरी अद्याप बळीत महिलेच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसल्याची नाराजी बळीत महिलेच्या आईने व्यक्त केली. याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचेही ना. रामदास आठवले म्हणाले. 

  साकिनाका येथील महिलेवर बलात्कार आणि हत्येचा प्रकार अमानुष असून या प्रकरणातील नराधम आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी आपली मागणी आहे. बळीत महिलेचे कुटुंबिय भाड्याच्या घरात राहत असून त्यांना घर नसल्याने राज्य शासनाने एमएमआरडीए च्या माध्यमातून त्या कुटुंबाला घर देण्यासाठी निर्णय घ्यावा त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले .

  यावेळी बाबुशा कांबळे,सलीम खान,अमिना खान,योगीराज भोसले आदींसह अनेक रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: