मंगळवेढ्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले:अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Mangalwedha crime news: मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 5 रोजी रात्री सुमारे 12.30 ते सकाळी 6 या वेळेत ही घटना घडली. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून राहत्या घरातून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे दिली आहे.

त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.बनकर करत आहेत. दरम्यान, पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Back To Top