एक राखी भारतीय सैनिकासाठी पंढरपुरातील नाईकनवरे परिवाराचा उपक्रम
पंढरपुरातील नाईकनवरे परिवाराने सीमेवरील सैनिकांना पाठवल्या हजारो राख्या
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपुरातील संतपेठ भाई भाई चौक येथे राहणारे समाजसेवक दिपक राजाराम नाईकनवरे यांनी एक राखी भारतीय सैनिकांसाठी हा कार्यक्रम घेतला आणि समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला.
सैनिकाच्या योगदानातूनच संपूर्ण भारत देश सुखाने झोपू शकतो.आपल्या भारत मातेच्या सेवेसाठी दिवस रात्र आपल्या प्राणाची बाजी लावून भारतीय जवान सीमेवर तैनात असतात.
सण असो वा आनंदाचा दिवस सैनिक सेवा हाच मोठा सण मानणारे सैनिक जवान बंधू आपल्या कुटुंबाची कोणतीही पर्वा न करता दिवस-रात्र सीमेवर तैनात राहून देश सेवा करत असतात.
आपल्या भारत माते ची अखेरच्या श्वासापर्यंत सेवा करणारे हे सैनिक बांधव आणि या सैनिक बांधवांमुळे आपण ताठ मानेने व सुरक्षित वातावरणात जगू शकतो.
भारतीय जवानांचा आदर्श घेऊन आपण देशसेवेसाठी जीव झोकून दिला पाहिजे. नव्या पिढीने भारत माता सुजलम सुफलम करण्याचं काम केले पाहिजे.मी एक बहीण म्हणून ,आई म्हणून माझ्या भावाला किंवा मुलाला अभिमानाने राखी बांधण्याचा हा आनंद मिळतो तो जगात कुठेही मिळत नाही.आज भारत मातेच्या या जवानांमुळे प्रत्येक युवकाला ऊर्जा मिळते तसेच जवानांनाही प्रत्येक बहिणीच्या मायेचा प्रेमाचा ओलावा, अनुभवता यावा या जाणिवेतून एक राखी सैनिकासाठी ही संकल्पना मनात घेवून पंढरपुरातील सुनंदा राजाराम नाईकनवरे व त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी लहानापासून ते वृद्धापर्यंत हजारो राख्या एकत्र करून सीमेवर पाठवण्यात आल्या.
भारत मातेच्या सीमेवर भाऊ देशासाठी सेवा करतात आणि आम्ही त्यांच्या लाडकी बहीणींना त्यांना प्रत्यक्ष राखी बांधण्यासाठी योग नाही ती उणीव भरून काढण्यासाठी पोस्टद्वारे एक राखी सैनिकासाठी हा उपक्रम राबवतो. सैनिक भावाच्या हातामध्ये बहिणीने राखी बांधल्याने त्या भावांच्या मनगटात बळ येते आणि आपल्या देशासाठी रक्षा करण्यासाठी उर्जा मिळते. म्हणून आम्ही नाईकनवरे परिवार दर वर्षी सीमेवर घरापासून दूर राहून देशसेवा करणार्या हजारो भावांना राख्या पाठवण्याचं काम करतो.
संतपेठ येथील नाईकनवरे परिवार हे आदर्श कुटुंब मानले जाते कारण त्यांचे वडील ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय राजाराम महादेव नाईकनवरे यांचा वारसा त्यांची पत्नी व मुले पुढे चालवतात.त्यांचा मोठा मुलगा मेजर विक्रम राजाराम नाईकनवरे व दिपक राजाराम नाईकनवरे,त्यांची दोन मुलं नातू जावई तसेच सर्व नातेवाईक दादांचा वारसा जोपासतात आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मेजर विक्रम राजाराम नाईकनवरे हे सीमेवर कार्यरत आहेत . त्यांच्या मातोश्री सुनंदा राजाराम नाईकनवरे आपला मुलगा देश सेवेसाठी काम करतो हे मला अभिमानास्पद आहे असे सांगून बहिणीकडून आपल्या जवान बांधवांना राख्या पाठवण्याचं काम करत आहेत.
पंढरपूरमधील नाईकनवरे कुटुंबाने सैनिकांप्रती प्रेम आणि आपुलकीचे नाते जोडलेले आहे.याही वर्षी बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने देशातील ९ युनिट मधील जवानांना राख्या पाठवल्या आहेत.
सदर कार्यक्रम पंढरपूर मुख्य पोस्ट ऑफिस येथे घेण्यात आला.यावेळी पोस्टमास्तर सोमनाथ गायकवाड, विनोद धायगुडे,सपना सलगर,वैजनाथ महामुनी, शेख ,श्रीमती सुनंदा नाईकनवरे,दिपक नाईकनवरे, राणी खंडागळे व कर्मचारी बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर , संघटना कार्यकर्ते व महिला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते .
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------