पाकिस्तानचे कौतुक तर काश्मीरबाबत तालिबानने केले ‘हे’ वक्तव्य


काबूल: अफगाणिस्तान सरकारच्या माहिती खात्याचे उपमंत्री आणि तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने पाकिस्तानवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर अफगाणिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल मुजाहिदने पाकिस्तानचे आभार मानले आहे. त्याच वेळी त्याने काश्मीरबाबतही वक्तव्य केले आहे.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काश्मीरचा मुद्या हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी काश्मीरमधील पीडित मुस्लिमांसाठी तालिबान आवाज उठवणार असल्याचे म्हटले होते. आता, जबीउल्लाह मुजाहिदने पु्न्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे. जगातील काही भागांमध्ये मुस्लिमांना चुकीची वागणूक दिली जात आहे. मुस्लिमांवर अत्याचार होत आहे. ही चिंताजनक असून आम्ही त्याच्याविरोधात आहोत. जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असून त्याचा निषेध करत असल्याचेही जबीउल्लाह मुजाहिदने म्हटले. अफगाणिस्तान सरकार जगातील विविध ठिकाणच्या पीडित मुस्लिमांना राजनयिक आणि राजकीय मदत देणार असल्याचेही त्याने म्हटले.

अफगाणिस्तानच्या मुद्यावर पंतप्रधान मोदींचे भाष्य, म्हणाले…
जबीउल्लाहने म्हटले की, पाकिस्तान हा आमचा शेजारचा देश आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानबाबत घेतलेल्या भूमिकेसाठी आम्ही आभारी असल्याचे त्याने म्हटले. मुजाहिदने पुढे म्हटले की, अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायासोबत चांगले संबंध हवे आहेत. व्यापार आणि आर्थिक संबंध आणखी वृद्धिगंत करायचे आहेत. आमचे शेजारचे देश आंतरराष्ट्रीय समुदायासमोर अफगाणिस्तानला पाठिंबा देणे सुरू ठेवतील अशी अपेक्षा असल्याचे जबीउल्लाहने म्हटले.

अफगाणिस्तान: तालिबानी राजवटीचा आदेश; दाढी कापण्यावर बंदी
मुजाहिदने म्हटले की, अनेक देशांमनी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि अमेरिकेसमोर आमच्या बाजूने आवाज उठवला. कतार, उज्बेकिस्तान आणि अन्य देशांनीदेखील अफगाणिस्तानबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. सहा दिवसांपूर्वी चीन आणि रशियानेदेखील आमच्या बाजूने वक्तव्य केले होते.

पाकिस्तानला धक्का; तालिबान मुद्यावरून ‘सार्क’ची बैठक रद्द
व्यापार वाढवण्याचा प्रयत्न

पंजशीर खोऱ्यात युद्ध संपले असल्याची माहिती जबीउल्लाह मुजाहिदने दिली. आता आम्हाला कोणासोबतही युद्ध अथवा हिंसाचार नको. अफगाणिस्तानमध्ये प्रगती आणि समृद्धीसाठी काम सुरू करण्याची वेळ आली आहे. अफगाणिस्तानमधील शांततेनंतर दुसऱ्या देशांसोबत व्यापार वाढवणे ही आमची प्राथमिकता असल्याचे मुजाहिदने म्हटले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: