‘मॅडम, काहीच आशा उरली नाही…’ काँग्रेसचा राजीनामा देत नेत्याचे सोनिया गांधींना पत्र


पणजीः गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार लुइझिन्हो फालेरो यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. फालेरो काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात राजीनामा दिला आहे. तसंच ‘काँग्रेसमध्ये आपल्याला कुठलीही उमेद दिसत नाहीए आणि पक्षाचं अध:पतन रोखण्याची कोणतीही आशा आणि इच्छा दिसत नाहीए. ज्या काँग्रेस पक्षासाठी आम्ही लढलो, आता ती काँग्रेस राहिली नाही, असंही ते म्हणाले.

७० वर्षांच्या लुइझिन्हो फालेरो हे तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यांनी राजीनामा देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले.

गोव्या सरकार स्थापनेसाठी काँग्रेसकडे २०१७ मध्ये पुरेशा संख्येत आमदारही होते. पण आपल्याला वाट पाहण्यास सांगितले गेले. याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागली. भाजपने घोडेबाजार करून तेव्हा आपली सत्तास्थापन केली, असा आरोप त्यांनी केला.

लुइझिन्हो फालेरो यांनी सोमवारी आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याच्या काही मिनिटं आधी लुइझिन्हो फालेरो यांनी ममता बॅनर्जींचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींचा सामना करण्यासाठी ममतांसारख्या नेत्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

फालेरो हे नवेलिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. गोव्यात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना गोवा काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आले होते. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राजेश पाटनेकर यांच्याकडे आपला राजीनामा दिला.

भवानीपूर पोटनिवडणूक रद्द होणार? निवडणूक आयोगाने मागितला अहवाल

फालेरो यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस आमदारांची विधानसभेतील संख्या कमी होऊन ती ४ इतकी झाली आहे. गोव्यात विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या. पण नंतर आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला. जुलै २०१९ मध्ये १० आमदारांनी काँग्रेस सोडली आणि सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला.

‘भारत बंदने नागरिकांना त्रास, पण एक दिवस शेतकऱ्यांच्या नावे समजून विसरून जा’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: