बिहारच्या एलजेपीआरचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या कारचे स्वयंचिलत चालान कापण्यात आले. टोल प्लाझावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चिराग पासवान यांच्या वाहनाचे चालान कापले.
राज्यातील सर्व टोल नाक्यावर स्वयंचिलत चालान साठी सीसीटीव्ही केमेरे बसवण्यात आले आहे. हे केमेरे टोल वरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची छायाचित्रे टिपतात.त्यांच्यावर मुख्यालयातून नजर ठेवली जाते. कागदपत्रे अपूर्ण असतील तर स्वयंचलित चालान कापले जाते. आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवले जाते.
चिराग पासवान पाटण्याहूनचंपारण जात असताना वाटेत असणाऱ्या टोल प्लाझावरून स्वयंचलित चालान कापण्यात आले. वाहनाचे चालान कोणत्याकारणास्तव कापण्यात आले हे कळू शकले नाही. याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Edited by – Priya Dixit
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------