महिला अत्याचारांवर आरएसएस ने जलद न्याय देण्याची मागणी केली


mohan bhagwat
केरळ मध्ये पलक्कड येथे राष्ट्रीय स्वयं सेवक संघ(RSS) ने तीन दिवसांच्या समन्वय बैठकीत महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात जलद न्याय मिळावा या नाही  कायदेशीर चौकट निर्माण करण्यावर राज्य आणि केंद्र सरकारने भर द्यावी. 

कायदेशीर चौकट मजबूत करणे, समाजात जागरूकता वाढवणे, तसेच डिजिटल सामग्रींशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे आवश्यक होते. ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या सामग्रींचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी देशभरात व्यापक मोहीम राबवण्याची गरज असल्याचे संघाने म्हटले. संघाने कोलकाता घटनेचा निषेध केला आणि त्याला अत्यंत दुर्देवी घटना असल्याचे म्हटले. 

पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष भाजपने कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा दावा करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला गोत्यात उभे केले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णयावर संघ सहमत नसल्याचे म्हणाले. 

संघाच्या समन्वय बैठकीत भागवत, नड्डा यांच्यासह ३०० हून अधिक लोकांनी विचारमंथन केले, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार, भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष आणि इतर ३२ जण सहभागी झाले होते. संघाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह सुमारे 300 कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited by – Priya Dixit  

  



Source link


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading