Video: २५ चेंडूत विस्फोटक ५० धावा; या खेळाडूंच्या सल्लानंतर ईशानला फॉर्म गवसला
मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मासह ईशान किशन सलामीला आला होता. खराब फॉर्ममुळे ईशानला काही लढतीसाठी संघबाहेर ठेवले होते. राजस्थानविरुद्ध त्याला पुन्हा संधी मिळाली. फॉर्ममध्ये परत येण्यासाठीची संधी त्याने गमावली नाही. ईशानने फक्त २५ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मुंबईला या लढतीत लवकर विजय मिळून गुणतक्त्यातील नेट रनरेट चांगले करायचे होते. इशानच्या स्फोटक फलंदाजीमुळे मुंबईने विजयाबरोबर रनरेट देखील चांगले केले.
वाचा- धोनीच्या निवृत्तीवर CSK ने दिलं मोठं अपडेट; वाचा सविस्तर बातमी
इशानने आयपीएलच्या हा हंगामातील याआधीच्या ८ लढतीत १०७ धावा केल्या होत्या. पण १० चेंडू डॉट खेळल्यानंतर त्याने २५ चेंडूत नाबाद अर्धशतक केले. यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सामना झाल्यानंतर ईशानने सांगितले की, फॉर्ममध्ये परत येण्यासाठी विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड यांची खुप मोठी मदत झाली. त्यांनी दिलेला सल्ला उपयोगी पडला. गेल्या काही सामन्यातील व्हिडिओ पाहिल्यानंतर मला लक्षात आले की मी कोणत्या चुका करतोय. त्यानंतर ज्या सामन्यात मी चांगली फलंदाजी केली होती त्याचे व्हिडिओ देखील पहिले. यामुळे मला आत्मविश्वास मिळाला. चढ उतार हा खेळाचा एक भाग असतो. आता पुन्हा धावा करून छान वाटत आहे. आता हीच लय कायम ठेवायची आहे.
वाचा-T20 World Cup : बीसीसीआय होणार मालामाल; यामुळे कोट्यवधींचा होणार फायदा
राजस्थानवरील विजयाने मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा कायम राहिल्या आहेत. मुंबईचे १३ सामन्यात १२ गुण झाले आहेत. ते गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहेत.