टिटेघर येथे रामेश्वर मंडळाची पर्यावरणपुरक सजावट

टिटेघर येथे रामेश्वर मंडळाची पर्यावरणपुरक सजावट

टिटेघर,रायरेश्वर/ज्ञानप्रवाह न्यूज – शिवछत्रपतींचे पदस्पर्शाने पावन झालेल्या रायरेश्वर चे पायथ्याशी असलेल्या टिटेघर गावातील रामेश्वर सेवा व क्रिडा मंडळाने गणेशोत्सवामध्ये यंदा सजावट म्हणून वडाचे पानांनी बनवलेल्या द्रोण पत्रावळ्यांचा वापर करुन भव्य दिव्य सजावट केली आहे.

या सर्व सजावटिसाठी १००० द्रोण व ९०० पत्रावळी लागल्या.ही सजावट वीसगाव खोर्यातील गणेशभक्तांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.अनेक गणेशभक्तांनी टिटेघर येथे जावून या सजावटीच्या वेगळेपणाचा अनुभव घेतला.

दरवर्षी नित्य व वेगळे पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा पायंडा रामेश्वर सेवा व क्रिडा मंडळाने गेली ३५ वर्षे जोपासलेला आहे. गणेश मुर्तीवर राजेंद्र वाडकर यांनी केलेले सुंदर डायमंड वर्क गणेशभक्तांना भावले. मंडळाचे संस्थापक शंकर तुकाराम सणस, अध्यक्ष दत्तात्रेय लक्ष्मण सणस, उपाध्यक्ष संतोष जगन्नाथ नवघणे यांचे नेतृत्वात मंडळ एका चांगल्या दिशेने मार्गाक्रमण करत असल्याची ग्वाही गणेशभक्तांनी दिली आहे.

श्री गणेशाचे सत्यनारायण पुजेसाठी पंचक्रोशितील अनेक मंडळांनी कार्यकर्त्यांसह उपस्थिती दाखवली.रात्री प्राथमिक शाळेतील मुलांसाठी मराठी गाणी व त्यावर नृत्यस्पर्धा पार पडली.

संपुर्ण टिटेघर गावात मोफत धुरळणी करुन डेंग्यु व चिकणगुणिया प्रतीबंधात्मक उपाय योजना करण्याचा उपक्रम लवकरच घेण्यात येणार आहे.मंडळाचे माध्यमातून क्रिकेट स्पर्धा,संगीत खुर्ची तसैच रक्तदान शिबीरां सारखे अनेक उपक्रम मागील चार वर्षांपासून राबवण्यात येत आहेत. पर्यावरणपुरक सजावटीचा कार्यकर्त्यांनी केलेला हा नाविन्यपुर्ण उपक्रम म्हणजे कलेचा, विज्ञानाचा संगम साधून पर्यावरण हित जोपसण्याचे उत्तम उदाहरण असल्याची चर्चा आहे.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading