डिजीटल अरेस्टपासून सावध रहा – ॲड.चैतन्य भंडारी

डिजीटल अरेस्ट पासून सावध रहा, आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे ॲड.चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज- सध्या ऑनलाईनच्या जमान्यात सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे ॲड.चैतन्य भंडारी यांचे सायबर समस्येवर व्याख्यान झाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना सायबरच्या अनुषंगाने येणा-या विविध समस्यांचे निराकरण केले.

विद्यार्थ्यांना हल्ली चाललेल्या डिजीटल अरेस्ट फ्रॉडबद्दल त्यांनी माहिती दिली.सायबर फ्रॉड करणारे वेगवेगळ्या स्वरूपात नवनवीन तंत्रज्ञान वापरून फ्रॉड करत आहेत. अशाच एका नवीन फ्रॉडबद्दल महिती देताना सांगितले की, कोणताही पोलिस अधिकारी आपणास डिजीटल अरेस्ट म्हणजेच ऑनलाईन अटक करु शकत नाही. तसेच डिजीटल अरेस्टबाबत लोकांनी जास्त पॅनिक होवू नये कारण हे सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरीकांना डिजीटल अरेस्टची भिती दाखवून त्यांची आर्थिक फसवणुक करतात व विद्यार्थ्यांना पार्सल फ्रॉड व तुमच्या पार्सल मध्ये अंमली पदार्थ सापडलेले आहेत यासारख्या विविध फ्रॉड पासून सावध कसे राहावे याविषयी ॲड चैतन्य भंडारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी हिडन कॅमेरा पासून सावधान कसे रहावे याबाबत देखील ॲड चैतन्य भंडारी यांनी माहिती दिली.विद्यार्थ्यांनी त्यांच्या सायबर सायकोलॉजीमध्ये सकारात्मक बदल करणे याबाबत तसेच जे काही विद्यार्थी सायबर ऑनलाईन छळवणुक, ऑनलाईन बुलिंग, हिडन कॅमेरा याला बळी पडले असतील, ऑनलाईनच्या समस्यांमुळे डिप्रेशनमध्ये गेले असतील त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.

यावेळी ऑनलाईन जॉबच्या संदर्भात ॲड. चैतन्य भंडारी यांच्याशी विद्यार्थ्यांनी चर्चा करुन त्यांना या विषयी येणा-या शंका विचारल्या.त्यावेळी ॲड.चैतन्य भंडारी यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कॉलेजचे डायरेक्टर डॉ.जयंत पाटील, सौ.अमृता भंडारी, उपप्राचार्य पी.जे. देसले, व्ही.एस.बावीस्कर,एम. एस.सोनवणे, व्ही.आर.विसपुते आदींसह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कॉलेजमधील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading