दिवाळीत कर्ज स्वस्त होणार? रिझर्व्ह बँंक थोड्याच वेळात जाहीर करणार पतधोरण


हायलाइट्स:

  • आज बँकेकडून द्विमासिक पतधोरण जाहीर केले जाणार आहे.
  • वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्याजदर जैसे थेच ठेवले जाण्याची शक्यता
  • आरबीआयने रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवला होता.

मुंबई : करोना संकटातून अर्थव्यवस्था सावरली असून दसरा दिवाळीत ग्राहकांच्या क्रयशक्तीला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदर कपात करेल का हे थोड्याच वेळात कळणार आहे. पतधोरण समितीची बुधवारपासून बैठक सुरु आहे. आज बँकेकडून द्विमासिक पतधोरण जाहीर केले जाणार आहे. मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर बँकेकडून व्याजदर जैसे थेच ठेवले जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

गृह कर्ज घेताय ; सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँंकेने केली कर्ज दरात कपात
आज प्रमुख व्याजदरात कोणताही बदल झाला नाही तर सलग आठव्या बैठकीत व्याजदर जैसे थे राहतील. यापूर्वी मार्च २०२० मध्ये बँकेने रेपो दर ०.७५ टक्क्याने कमी केला होता. तर त्यानंतर मे २०२० मध्ये रेपो दरात ०.४० टक्के कपात करण्यात होती. या दोन कपातीनंतर रेपो दर ४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

सोने-चांदीमध्ये महागले ; जाणून घ्या आजचा सराफाचा भाव
मागील काही पतधोरणात रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या उपाययोजना हाती घेतल्या होत्या. बाजारात रोकड उपलब्धतेसाठी उपाय करण्यात आले होते. बँकांना रोखीचा तुडवडा भासू नये म्हणून दर कमी करण्यात आले होते. मात्र रेपो दर स्थिर ठेवला होता.

बिटकॉइनमध्ये प्रचंड वाढ; ‘या’ कारणांमुळे बिटकॉइनसह इतर क्रिप्टो करन्सी महागले
देशात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. त्याचबरोबर दुसऱ्या तिमाहीत विकास दरात वृद्धी झाली आहे. मात्र कच्च्या तेलाच्या महागाईने इंधन दरात वाढ झाली आहे. महागाईचा पारा वाढत असल्याने बँकेसमोर महागाई नियंत्रण आव्हान बनले आहे.

मिळेल आयकरात सूट; आरोग्य विमा खरेदी करा आणि मिळवा दुहेरी फायदा
करोनाच्या दुसऱ्या लाटेत अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले तसेच महागाईचा पारा वाढल्याने आॅगस्टमध्ये जाहीर झालेल्या पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. परिणामी स्वस्त कर्जांसाठी कर्जदारांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. आरबीआयने रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: