एअर इंडिया स्वगृही ; रतन टाटांनी केलं स्वागत, म्हणाले आज जेआरडी असते तर…


हायलाइट्स:

  • तब्बल ६८ वर्षांनंतर टाटा समूहाकडे एअर इंडियाचे मालकी हक्क प्राप्त झाले
  • केंद्र सरकारच्या घोषणेनंतर टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी स्वागत केले.
  • वाई वाहतूक क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केल्याबाबद सरकारच्या धोरणाचे रतन टाटा यांनी कौतुक केले.

मुंबई : तब्बल ६८ वर्षांनंतर टाटा समूहाला मालकी हक्क प्राप्त झालेल्या एअर इंडियाचे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी स्वागत केले आहे. टाटा समूहाचे द्रष्टे नेतृत्व असलेल्या जेआरडी टाटा यांच्या कारकिर्दीत एअर इंडियाला मिळालेलं गतवैभव पुन्हा प्राप्त करु, असा आशावाद रतन टाटा यांनी व्यक्त केला. आज आपल्यात जेआरडी असते तर त्यांना नक्कीच खूप आनंद झाला असता, अशा भावना टाटा यांनी ट्विटमधून व्यक्त केल्या.

गृह कर्ज घेताय ; सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँंकेने केली कर्ज दरात कपात
आज शुक्रवारी केंद्र सरकारकडून एअर इंडियासाठी यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीची घोषणा करण्यात आली. टाटा सन्सचा १८००० कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या वृत्तानंतर रतन टाटा यांनी ट्विट करून एअर इंडिया पुन्हा स्वगृही आल्याबद्दल स्वागत केले. ट्विटमध्ये पोस्ट केलेल्या एका निवेदनात टाटा म्हणतात की टाटा समूहाने एअर इंडियाची निविदा जिंकली ही आनंदाची बातमी आहे. मात्र एअर इंडियाची पुर्नबांधणी करण्यासाठी टाटा समूह ठोस प्रयत्न करेल. हवाई वाहतूक क्षेत्रात टाटा समूहासाठी यामुळे अनेक संधी उपलब्ध होतील.

निविदा उघडल्या ; अखेर टाटाच ठरले एअर इंडियाचे तारणहार, इतक्या कोटींना झाला सौदा
टाटा पुढे भावनिक होत असे म्हणतात की ,जेआरडी टाटा यांच्या नेतृत्त्वात एअर इंडियाने नावलौकिक मिळवला होता. जगातील सर्वात विश्वसनीय विमान कंपनी म्हणून ओळख निर्माण केली होती. टाटा समूहाला पुन्हा एअर इंडियाला गतवैभव मिळवून देण्याची संधी आहे. आज आपल्यात जेआरडी असते तर त्यांना नक्कीच खूप आनंद झाला असता, अशा भावना टाटा यांनी ट्विटमधून व्यक्त केल्या.

RBI ची मोठी घोषणा; डिजीटल व्यवहारांना दिले प्रोत्साहन, ‘IMPS’ बाबत घेतला हा निर्णय
रतन टाटा यांनी केंद्र सरकारचे देखील आभार मानले. हवाई वाहतूक क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केल्याबाबद सरकारच्या धोरणाचे रतन टाटा यांनी कौतुक केले.

भ्रमनिरास ! रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपातीला हुलकावणी, पतधोरणात घेतला ‘हा’ निर्णय
टाटा समूहाकडून १८००० कोटीना एअर इंडिया खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी १५ टक्के रक्कम केंद्र सरकारला मिळणार असून उर्वरित रक्कम कर्ज फेडीसाठी वापरली जाणार आहे. टॅलेस प्रा. लिमिटेडने एअर इंडियामध्ये १०० टक्के हिस्सा खरेदी करण्याची बोली प्रस्ताव जिंकला आहे, असे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: