Aryan Khan in jail: आर्यन खान तुरुंगात बराक क्रमांक १ मध्ये; बाहेरचे अन्न घेता येणार नाही


हायलाइट्स:

  • जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानची आर्थर रोड तुरुंगात रवानगी.
  • आर्यन खान इतर आरोपींसह बराक क्रमांक १ मध्ये.
  • तुरुंगाबाहेरचे अन्न खाण्यास मनाई.

मुंबई: क्रूझ वरील ड्रग पार्टी प्रकरणी (Drugs Party Case) बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यासह इतर आरोपींना जामीन नाकारत त्यांची आर्थररोड तुरुंगात (Arthur Road Jail) रवानगी करण्यात आली आहे. आता जामिनासाठी आर्यनखानसह इतर आरोपींना मुंबईच्या सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. तो पर्यंत आर्यन खान याला तुरुंगात राहावे लागणार असून त्याला आर्थररोड तुरुंगात पहिल्या मजल्यावर असलेल्या बराक क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आले आहे. (aryan khan is arthur road jail and he is not allowed to take food outside prison)

तुरुंगाबाहेरून अन्न घेता येणार नाही

आर्यन खानसह इतर आरोपींना काही करोनासदृश्य लक्षणे असल्यास त्यांची करोना चाचणीही करण्यात येणार आहे. तसेच त्यांना पाच दिवसांसाठी क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे आर्यन खानला तुरुगाबाहेरचं, अर्थात घरचं अन्न घेता येणार नाही. त्यामुळे आर्यन जेवढे दिवस आर्थररोड तुरुंगात राहील तेवढे दिवस त्याला इतर आरोपींप्रमाणे तुरुंगातील अन्नच खावे लागणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला मोठा धक्का; कोर्टाने जामीन नाकारला, तुरुंगात रवानगी

आर्यनखानसह एकूण ५ आरोपींना तुरुंगाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बराक क्रमांक १ मध्येच ठेवण्यात येत आहे. सर्व आरोपींना आता तुरुंगातील गणवेश परिधान करावा लागणार आहे. तसेच या सर्वांना तुरुंगातील इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक दिली जाईल गे स्पष्टच आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खान ड्रग प्रकरण: सुनावणीदरम्यान शाहरूख खानची मॅनेजर कोर्टात रडत होती

आर्यन खान याच्याकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडले नसल्याचे सांगत त्याचे वकील अ‍ॅडव्होकेट सतीश मानेशिंदे यांनी त्याच्या जामीनासाठी जोरदार युक्तीवाद केला. सुमारे अडीच तास हा युक्तीवाद चालला. मात्र त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला पकडून आणणाऱ्या के. पी. गोसावीला पुणे पोलिस शोधतायतSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: