भगवान महावीर अध्यासनाच्या कार्याचा आढावा घेऊन स्ववास्तु लवकरच परिपूर्ण करण्यात येईल – कुलगुरु प्रा.डॉ.डी.टी.शिर्के

भगवान महावीर अध्यासनाच्या कार्याचा आढावा घेऊन स्ववास्तु लवकरच परिपूर्ण करण्यात येईल – कुलगुरु प्रा.डॉ.डी.टी.शिर्के
कोल्हापूर ,०८/१०/२०२१ - शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूरचे कुलगुरु प्रा.डॉ.डी.टी.शिर्के यांचा सन्मान आज दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या नूतन स्ववास्तु उभारणी संदर्भात विद्यापीठात सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी कुलगुरु डॉ.शिर्के यांनी भगवान महावीर अध्यासनाच्या कार्याचा आढावा घेऊन स्ववास्तु लवकरात लवकर परिपूर्ण करण्यात येईल असे सांगितले. अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी या वास्तुसाठी सभेमार्फत सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी इमारत निधी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रावसाहेब आ. पाटील यांचा डॉ.शिर्के सरांच्या हस्ते विद्यापीठा मार्फत सन्मान केला. या नूतन वास्तुसाठी अरिहंत परिवारामार्फत रावसाहेब आ.पाटील यांनी रु.5 लाख, सभेचे चेअरमन रावसाहेब जि.पाटील यांनी स्वदेशी ट्रस्ट तसेच कर्मवीर चँरिटेबल ट्रस्ट मार्फत प्रत्येकी 1 लाख, सभेचे केंद्रिय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, सभेचे खजिनदार संजय शेटे, सभेच्या कोल्हापुर बोर्डिंगचे चेअरमन सुरेश रोटे,डॉ.आण्णासाहेब चोपडे,जीवंधर चौगुले,प्राचार्य श्रीधर हेरवाडे,सुरेंद्र जैन,एन.एन. पाटील यांनी प्रत्येकी रु.1 लाखाची देणगी जाहिर केली. यावेळी स्वागत डॉ.व्ही.बी.ककडे केले. प्रास्ताविकात डॉ.जे.एफ्.पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ.अजित ज.पाटील यांनी भगवान महावीर अध्यासनाचे महत्त्व आपल्या मनोगतात विषद केले. नूतन वास्तुचे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी सादरीकरण केले.यावेळी प्र.कुलगुरु डॉ.पी.एस.पाटील, डी.ए.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: