पंढरीत 1000 कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते वाटप

पंढरीत 1000 कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप…

गृहोपयोगी साहित्य संचाचे सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून वाटप

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सक्रिय जिवित नोंद असणा-या कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून पंढरपुरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरनगर येथे करण्यात आले.

या संचाचे वाटप विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी संबोधित करताना कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कामगारांचा घरकुल प्रश्न प्राधान्याने सोडवून, पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेची घरे कामगारांना देण्यासाठी प्रयत्नशील असून कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, सामाजिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. सामाजिक कार्य करताना उपेक्षित, वंचितांसाठी काम करणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

यावेळेस रवी सर्वगोड,प्रदीप परकाळे,शाहू सर्वगोड,किशोर कदम,समाधान भोसले, सतीश सर्वगोड,सिध्दनाथ सांवत, राजेंद्र सर्वगोड,लक्ष्मण बंगाळे,तुकाराम मोळावडे, शरद सोनवणे,अमोल पाटील,गणेश सर्वगोड, स्वप्नील कांबळे,सुरज साखरे आदी उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading