महात्मा बसवेश्वरांची ८९५ वी जयंती उत्साहात; समाजबांधवांचा मोठा सहभाग

महात्मा बसवेश्वरांची ८९५ वी जयंती उत्साहात; समाजबांधवांचा मोठा सहभाग

बसवेश्वर जयंती निमित्त विविध मान्यवरांचा सन्मान, सामाजिक कार्याची उजळणी

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०४/ २०२६- समतानायक आद्य समाजसुधारक आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विरशैव सभेच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. नगरसेवक निलराज डोंबे यांच्या हस्ते पूजन पार पडले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार कटप उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र विरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश भादुले, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भिंगे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक राजकुमार जेठे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांवर प्रकाश टाकत समाजासाठी त्यांच्या कार्याची महती विशद केली.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. ICICI बँकेचे मॅनेजर राजेश हुंडेकरी यांचे सुपुत्र श्रेयश यांनी SSC परीक्षेत ९०% गुण मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेना शिंदे गटाचे नेते ओंकार बसवंती यांनी लिंगायत स्मशान भूमीच्या विकासा साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शहराध्यक्ष विशाल आर्वे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष धनंजय मेनकुदळे यांनी केले.

या कार्यक्रमास श्रीनिवास उपळकर,सौरभ भादुले,आनंद मेनकुदळे, अनिल डोंबे, उमेश वायचळ, बसवराज मरळे, प्रशांत मेनकुदळे, सोहम भिंगे, महेश विभुते, विश्वनाथ कावळे, राजाभाऊ शेटे, संजय म्हमाणे, विशाल डोंगरे, वेदांत पाटील, विश्वास ठिगळे, सिद्धेश्वर शिळ्ळे, प्रथम भिंगारे, शिरीष पंतोजी, सुरज पावले आदी मान्यवर व बसवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top