lakhimpur kheri incident : लखीमपूर प्रकरणावर भाजपचे डॅमेज कंट्रोल; दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक


नवी दिल्लीः लखीमपूर खिरीतील हिंसाचाराबाबत दिल्लीत भाजपचे मंथन सुरू आहे. लखीमपूर हिंसाचाराबाबत उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्यासह अनेक नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे. स्वतंत्र देव सिंह यांच्यासह राज्य प्रभारी राधामोहन सिंह आणि संघटना मंत्री सुनील बन्सल देखील दिल्लीला पोहोचले आहेत. लखीमपूर हिंसाचारावरून गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत. हे पाहता ही बैठक महत्त्वाची आहे.

लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर डॅमेज कंट्रोल करण्यात भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. लुटमार कारण्यासाठी किंवा कोणालाही कारने चिरडण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. आपल्याला आपल्या जनतेची करण्यासाठी आणि आपल्या वर्तनातून मतं मिळाली आहे, असं स्वतंत्र देव सिंह पक्ष कार्यकर्त्यांना म्हणाले.

Uttarakhand Elections: मंत्रीपदावर पाणी सोडत भाजप नेत्याची मुलासहीत काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’!

आशिष मिश्राच्या पोलीस कोठडीवर सुनावणी होणार

लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राच्या पोलीस कोठडीवर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीला आशिषला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करायची आहे.

मोदींना ‘लोकशाही नेते’ म्हणणाऱ्या अमित शहांवर प्रसिद्ध खेळाडूची टिप्पणी चर्चेत

लखीमपूर खिरीचे भाजपाचे बूथ अध्यक्ष राम गोपाल पांडे यांनी राजीनामा दिला आहे. भाजप नेते आपल्या कार्यकर्त्यांना साथ देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तिकुनिया घटनेत हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबाला कोणताही मंत्री भेटायला गेला नाही, असं ते म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: