श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान

श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०९/२०२४- श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिरच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील परदेशीनगर येथील श्री गणेश मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवले .यात 80 पेक्षा जास्त मुले सहभागी झाली होती. मुलांनी मंदिर परिसरात वाढलेली झाडे- झुडपे, गवत काढले. कचरा गोळा केला आणि मंदिर परिसर स्वच्छ केला.

श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिरचे संघटक रवींद्र साळुंखे, मुख्याध्यापक संतोष कवडे, महेश भोसले,दिनेश आगावणे, अश्पाक मुजावर , आलंदीप टापरे ,प्रमोद हुंगे आदी यावेळी उपस्थित होते. या कामाबद्दल परदेशीनगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Back To Top