Poonch Terror Attack: पूँछ हल्ल्यातील शहीद जवानाच्या पार्थिवाला मुख्यमंत्र्यांनी दिला खांदा


हायलाइट्स:

  • ११ ऑक्टोबर रोजी पूँछमध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत पाच जवान शहीद
  • शहीदांत पंजाबचे सुपुत्र सैनिक गज्जण सिंह यांचाही समावेश
  • शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

चंदीगड : जम्मू काश्मीरच्या पूँछ क्षेत्रात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद गज्जण सिंह यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार पार पडले. शहीद गज्जण सिंह यांच्या अंत्ययात्रेत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि विधानसभेचे सभापती के पी राणा यांच्यासहीत इतर नेतेही उपस्थित झाले होते.

पंजाबच्या नुरपूरबेदी गावच्या पचरंडा भागातील रहिवासी असलेल्या सैनिक गज्जण सिंह यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. मंगळवारी सकाळी शहीद जवानाचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी दाखल झालं.

यावेळी, अंत्ययात्रेत सहभागी होत मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि के पी राणा यांनी शहिदाच्या पार्थिवाला खांदा दिला. राणा यांचे पुत्र विश्वपाल राणा हे मंगळवारी सकाळीच शहिदाच्या निवासस्थानी पोहचले होते. सैनिकांच्या अत्युच्च बलिदानाचा अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं.

२८ वर्षीय शिपाई गज्जण सिंह २३ शीख रेजिमेंटचा एक भाग होते. पूँछमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये गज्जण सिंह यांचाही समावेश आहे. गज्जण सिंह यांच्यामागे कुटुंबात पिता चरण सिंह, आई, भाऊ आणि पत्नी हरप्रीत कौर यांचा समावेश आहे.


Corona Death: करोना मृतांच्या कुटुंबाला ५० हजारांची मदत, पंजाब सरकारची घोषणा
pakistani terrorist arrest : धक्कादायक! पाकिस्तानी दहशतवादी दिल्लीत १० वर्षांपासून लपून होता, काय म्हणाले पोलीस?

मुख्यमंत्र्यांची ५० लाख रुपये मदतीची घोषणा
दरम्यान, पंजाबचे मुख्यंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी दहशतवादी हल्ल्यातील शहीद नायब सुभेदार जसबिंदर सिंह, नायक मनदीप सिंह, शिपाई गज्जन सिंह यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केलीय.

‘गजनवी फोर्स’नं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

पूँछ दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ‘गजनवी फोर्स’ नावाच्या एका संघटनेनं स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी नव्यानंच हा ग्रुप प्रस्थापित केल्याची माहिती समोर येतेय. मात्र सुरक्षा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘गजनवी फोर्स’च्या नावामागे लपून ‘लष्कर ए तोयबा’कडून हे दहशतवादी हल्ले घडविले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हल्ल्यात पाच जवान शहीद

११ ऑक्टोबर रोजी घडवून आणल्या गेलेल्या या हल्ल्यात एका जेसीओ रँकच्या अधिकाऱ्यासहीत पाच जवान शहीद झाले. नायब सुभेदार जसबिंदर सिंह, नायक मनदीप सिंह, शिपाई गज्जन सिंह, शिपाई सरज सिंह आणि शिपाई वैसाख सिंह अशी शहीद जवानांची नावं आहेत.

लखीमपूर हिंसा : राहुल-प्रियांका गांधी राष्ट्रपतींच्या भेटीला, दोन मागण्या मांडल्या
Govind Dotasara: ‘…तर महिला स्वत:ला पुरुषांच्या वरचढ समजू लागतात’, शिक्षणमंत्र्यांची वाचाळ बडबडSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: