मनसेच्यावतीने नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मनसेच्यावतीने नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

आदिशक्ती नवरात्र मंडळ नागालँड चौक पंढरपूर येथे देवींची मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पूजा

नवरात्री निमित्त देवदासी, तृतीयपंथी महिलांचा मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरांत प्रसिद्ध असलेल्या आदिशक्ती नवरात्र मंडळ नागालँड चौक पंढरपूर यांच्यावतीने देवीचा उत्सव मोठ्या साजरा केला जातो.

यावेळी आदिशक्ती नवरात्र मंडळाच्या देवींची पूजा मनसे नेते आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी नगरसेवक महादेव धोत्रे,अध्यक्ष धनाजी धोत्रे, एकनाथ ननवरे, संदीप रणवरे आदींसह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते,या विभागातील नागरिक उपस्थित होते.

तर नवरात्री निमित्त देवदासी, तृतीयपंथी महिलांचा मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने पंढरपूर शहरातील गाडगेबाबा मठ येथे आयोजित करण्यात आला होता.

सर्व देवदासी,तृतीयपंथी यांचा मेळावा घेऊन त्यांच्या अडीअडचणी विषयी चर्चा करण्यात आली.देवदासी, तृतीयपंथी यांच्या या मेळाव्यात मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला.

या मेळाव्यात बोलताना मनसे नेते आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दावेदार दिलीप धोत्रे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवदासी आणि तृतीयपंथीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी नवरात्री निमित्त सर्वांना फराळ,साडी चोळी, बांगडी कपडे इत्यादी वाटप करण्यात आले.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading