नवरात्र महोत्सव: आठवी माळ.
श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री.महालक्ष्मी माता पोशाख कोल्हापूर सह अलंकार परिधान
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१०/१०/२०२४- घटस्थापने पासून सुरू झालेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त दुपारी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले.त्यामध्ये रूक्मिणी मातेस महालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
श्री विठ्ठलास नक्षी टोप प्रभावळ सह, कौस्तुभ मणी,दंडपेठया जोड,हिऱ्याचे कंगन जोड, मोत्याची कंटी एक पदरी,मोत्याची कंटी दोन पदरी, मारवाडी पेठयाचा मोत्यांचा हार, मोत्यांचा तुरा, मस्त्य जोड, तुळशीची माळ,तोडे जोड,बाजीराव कंठी,चांदीचा कस्त्य इत्यादी.
रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट,जडपाचा हार,बाजूबंद जोड,खड्याची वेणी,पाचूची गरसोळी, चिंचपेटी हिरवी, कोल्हापुरी साज, मद्रासी कंठा, ठुशी, सोन्या मोत्याचे तारवड जोड, बाजीराव गरसोळी, खड्यांची बिंदी, मळ्यामोत्याच्या पाटल्या जोड,सोन्याचे बाजूबंद जोड,मस्य जोड,रूळ जोड, पैंजण जोड,मोठी नथ,कर्ण फुले जोड, ठुशी नवीन, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, चंद्रहार, अष्टपैलू मण्यांची कंठी, चंद्रहार मोठा, गोल मण्यांची कंठी, सूर्य इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
राधिका मातेस चांदीचा मुकुट,पुतळ्याची माळ, हायकोल, जवेच्या माळा, मोत्याचा कंठा व सत्यभामादेवीला मुकुट, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, पुतळ्यांच्या माळा, जवेची, माळ इत्यादी अलंकार व प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत.
मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई- तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.