सरकोली पर्यटन स्थळावर देशी केळीच्या 25 रोपांची/खुंट लागवड
रस्त्यावरील चिमण्यांच्या घरट्यातील चिमणी मला बोलू लागली

सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर पर्यटन स्थळावर काही मजूर,गावकरी व बाल सेवेकरी यांच्या श्रमदानातून रखरखत्या उन्हात देशी केळीच्या 25 रोपांची/खुंटाची लागवड करण्यात आली.या पुर्वी लावलेली केळीची बाग उत्पन्न देत आहेत.या बागेत कोणतेही खत न वापरता फक्त पाणी देवून उत्पादन घेण्यात येत आहे.मागेल त्याला वाजवी दराने केळी विक्री करण्यात येते.याचे व्यवस्थापन आण्णासाहेब भोसले सर पाहत आहेत .

श्रमदान करून परत येत असताना स्वेरी इंजिनियरिंग कॉलेजच्या पुढे ओढ्यात पुलाच्या बाजूला चिमण्यांनी काटेरी झाडाच्या फांद्यीला गवताने घरटी तयार केली आहेत ती दिसली आणि मी तेथे थांबून त्याचे फोटो घेतले.पावसाळा सुरू होण्यापूर्वी पावसाचा त्रास होऊ नये,अंडी पिल्ल सुरक्षित रहावीत, साप, मांजर, मुंगुस, इतर पक्ष्यांचा त्रास होवू नये यासाठी सुरक्षीतता मिळावी म्हणून सहसा काटेरी झाडाच्या शेवटच्या फांदीला, विहीर,ओढा, नदी अशा ठिकाणी घरटी बनवतात.चिमण्या या भेटेल तेथील ओले गवत चोचीने तोडून आणून टेक्नॉलॉजीयुक्त घरट्यांसाठी विण करतात.हे घरट फांदी पासून अजिबात निसटत नाही व आपण तोडण्याचा प्रयत्न केला तरी ते सहजासहजी तुटत नाही.या घरट्यांना दोन दरवाजे असतात.ही घरटी सहसा खाली पाणी व वरती झाड अशा ठिकाणी बनवतात याचे कारण त्यांच्या घरट्यांपर्यंत कोणालाही पोहचता येऊ नये.पाण्यामुळे थंडावा मिळतो. पिल्लांना लगेच चोचीत पाणी घेऊन पाजता येते.

तिथली एक चिमणी म्हणते मला कुठे चाळीस चाळीस मजली घर बांधता येते.घराला करोडो रुपयांचा खर्च करता तरीही तुम्ही सुखी नाही.एवढा खर्च करून तुम्ही निसर्गाचं समतोल बिघडवता.आम्हाला बसण्यासाठी निसर्गाने दिलेली जंगल झाडे तुम्ही तोडली आणि सिमेंटची जंगले तयार केली.मोबाइल व इतर संसाधनासाठी लागणारे नेट,टाॅवरमुळे त्यातून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे आमच्या पिढीला धोका निर्माण झाला आहे.तुम्ही एसी वापरता तरीही गरम होते म्हणून ओरडता. आमच्या घरट्यात तुम्ही एक दिवस राहण्यासाठी या म्हणजे तुम्हाला इथल्या नैसर्गिक हवेचा लाभ होईल शांतता मिळेल व गाढ झोप लागेल.प्रदुषण धुळीचा त्रास होणार नाही.कदाचीत पाऊस आला तर पावसाचा थेंबही अंगावर पडणार नाही.व झाडाकडून शुद्ध ऑक्सिजन हवा तुम्हाला मिळेल परंतु तुम्ही विलासी जीवन सोडून या गरीबाच्या घरात कसे येणार.तुमच जीवन खूप खूप धावपळीच झाले आहे.

तुम्हाला पुढील कित्येक पिढ्यांसाठी कमवून ठेवायच आहे.आमच काय लागेल तेवढच खातो, लागेल तेवढच तुम्ही अशुद्ध केलेले पाणी पितो.आम्हाला साठवून ठेवण्याची गरज नाही.कधीकधी नाही मिळाले तरी न तक्रार करता तसेच झोपून जातो.अलीकडे तर तुम्ही रासायनिक खतांचा द्रव्यांचा अती वापर केला आहे. त्यामुळे तुमच्या आणि आमच्या पिढीला धोका निर्माण झाला आहे.खत औषधांचे डोस वाढवल्यामुळे आमचे पक्षी रोज मरून पडू लागले आहेत.आम्हाला तुमच्या सुधारणा धोरणांचा खूप खूप त्रास होत आहे.पण आम्ही तक्रार कोणाकडे करावी.असो विषय माझ्या गवताच्या घरट्याचा होता.आमचं घरटं कोणाला विकता येत नाही व कोणी घेतही नाही.बर विकल तर त्या पैशाचे करायचं काय.आम्ही रोज फिरून फिरून शिवार पालथ घालून दानापाणी मिळवतो हेच चांगले आहे.

तमाम मनुष्य जातीला आमची विनंती आहे की आम्हा पक्षांना तुमच्याकडून त्रास तर होतोय पण अती त्रास झाला तर आमच्या पिढ्या नष्ट होतील व तुम्हाला धान्य पिकणार नाही. मगच तुम्हाला कळेल आमचे महत्त्व व तुमच्या सुधारणावादाचे परिणाम.बघा जमलं तर याबाबत विचार करा,बदल करा म्हणजे तुम्हीही वाचाल व आम्हीही वाचू असे सहज मनाला प्रत्यक्षदर्शी वेदना देवून गेलेले विचार माजी पोलीस अंमलदार विलास श्रीरंग भोसले यांनी व्यक्त केले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.