ईद मिलाद दिनी आटपाडीत जिलेबी वाटप

ईद मिलाद दिनी आटपाडीत जिलेबी वाटप

आटपाडी,दि.१९/१०/२०२१,प्रतिनिधी – इस्लाम धर्माचे संस्थापक, जगाला समता, बंधुता, शांती इत्पादी आदर्श मुल्यांची शिकवण देणारे प्रेषीत हजरत मोहंमद पैंगबर साहेबांच्या जन्मदिनाच्या औचित्याने ईद ए मिलादुन्नबी निमित्त आज आटपाडीत १०० किलो जिलेबीचे वाटप करून ईद साजरी करण्यात आली .

  प्रारंभी मौलानांच्या धार्मिक मंत्र पठनाने ईद मिलाद चा शुभारंभ करणेत आला.आटपाडी शहरातील मुस्लीम बांधव आणि युवकांनी एकत्र येवून ही ईद साजरी केली. ईद च्या अनुषंगाने १०० किलो जिलेबीचे भिन्न धर्मीय बांधवांमध्ये वाटप करून बंधुत्वाची भावना वाढीस लावण्यात आली.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्यसंख्याक विभागाचे राज्याचे महासचिव सादिक खाटीक यांचे हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा .एन.पी. खरजे यांना जिलेबीचे पाकीट प्रदान करून या जिलेबी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

  सादिक खाटीक यांची राष्ट्रवादी अल्पसंख्याक महासचिवपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव प्रा.एन.पी.खरजे सर यांनी त्यांच्या वतीने फेटा बांधून तर आटपाडी शहर मुस्लीम बांधवांच्यावतीने सलीम वंजारी यांचे हस्ते सादिक खाटीक यांना फेटा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

     यावेळी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर होळे,सुखदेव खताळ,नवनाथ खरजे,दिलावर शेख, फिरोज मुलाणी, वसंतदादा पाटील सेवा प्रतिष्ठानचे आटपाडी तालुका प्रतिनिधी असिफ खाटीक, रियाज शेख , रहमान खाटीक,मुसा शेख ,नासिर शेख, कुर्बानहुसेन खाटीक,आझाद खाटीक,समीर खाटीक, मुदस्सर कोतवाल ,गुंड्या शेख,अन्वर तांबोळी, मोहसिन शेख, रोमी शेख, बंदेनवाज आतार,तोसिफ शेख,अरबाज शेख,अमीर खाटीक, शब्बीर मुलाणी,इमरान शेख,इरफान शेख,नयुम शेख, कलंदरबाबा खाटीक,सुरज शेख, लालाभाई शिकलगार,हातिम शेख,सलमान शेख,राजू वंजारी, नईम शेख, वसीम शेख आदींची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: