दिलीप मानेना विश्वास सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणारच

दिलीप मानेना विश्वास सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे संसदेत जाणारच


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०४/२०२४- भाजप सरकारने मागील दहा वर्षात देशभरातील जनतेला केवळ पोकळ आश्वासने देण्याचे काम केले आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोलापूरच्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी करताना सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे या लोकसभेत जाणारच असा विश्वास माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केला.

महविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावभेटी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या प्रचार दौऱ्यात ति-हे या गावात झालेल्या सभेवेळी माजी आमदार दिलीप माने यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.यावेळी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, शिवसेना नेते प्रकाश वानकर, शालिवाहन माने, अमर पाटील, संजय पोळ, बाळासाहेब शेळके, प्रल्हाद काशीद, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा दादाराव पाटील, भारत जाधव, गोवर्धन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिलीप माने पुढे म्हणाले की, दहा वर्षांत कसलाही विकास झाला नाही.या जुमला सरकारने अच्छे दिन म्हणत जनतेला फसवलं आहे.भाजपच्या फसव्या धोरणा विरोधात रोष असल्याने आता मतदारांनी निवडणूक ताब्यात घेतली असुन भाजपविरोधी प्रचंड वारे निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापूर मतदार संघाचा विकास करण्यासाठी जनता यावेळी योग्य निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

भाजपला धडा शिकवा – प्रणिती शिंदे

यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपने मागील दहा वर्षात केवळ फसवी आश्वासने देऊन शेतकरी, तरुण, महिला मतदारांची फसवणूक केली आहे. शेती मालाला भाव नाही, कांद्याची निर्यात बंदी केली, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे सोलापुरात एकही उद्योग आला नाही.परिणामी बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचीही खंत आ.प्रणिती शिंदे यांनी बोलून दाखवली. त्यामुळं या निवडणुकीत भाजपाला धडा शिकवण्याची वेळ आली असून त्यांनी केलेल्या फसवणूकीचा बदला घ्या, असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी मतदारांना केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी देखील मागील दोन वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केलं.

शिवसेना नेते प्रकाश वानकर यांनी भाजपच्या फसव्या धोरणावर टीका करत यावेळी प्रणिती शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन केलं.

प्रणिती शिंदे यांनी आज दक्षिण विधान सभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांचा दौरा केला.यामध्ये समशापुर,नंदूर, पाथरी,डोणगाव,कवठे,बेलाटी,हिरज,ति-हे, शिवणी,पाकणी या गावांना भेटी दिल्या. यावेळी प्रत्येक गावातील महविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading