बांगलादेश: रोहिंग्या निर्वासित छावणीवर अंदाधुंद गोळीबार, सात ठार


ढाका: बांगलादेशमधील रोहिंग्या निर्वासित शिबिरात अंदाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारात सातजण ठार झाले आहेत. बांगलादेश पोलिसांनी माहिती दिली असल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले. निर्वासित शिबिरातील मदरसामध्ये गोळीबार करण्यात आला.

ढाका ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार, रोहिंग्या निर्वासित छावणीतील मदरशामध्ये हा गोळीबार झाला. या गोळीबारात चारजणांचा जागीच मृत्यू झाला. तर, तिघांचा रुग्णालयात उपचारामध्ये मृत्यू झाला.

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात लोकांनी सकाळी चार वाजण्याच्या सुमारास उखियामधील कॅम्प क्रमांक १८ च्या ब्लॉक एच-५२ मध्ये मदरशावर हल्ला केला. याआधी हा हल्ला रोहिंग्यांमधील दोन गटातील संघर्ष असल्याचे म्हटले जात होते.

बांगलादेशमध्ये हिंदूवर हल्ले; पंतप्रधानांचे कारवाईचे आदेश, ४५० जण अटकेत
उखियाचे पोलीस अधीक्षक शिहाब कॅसर यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, या हल्ल्यानंतर चार जणांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारातील जखमींना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.

चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्याने चुकून गोळी झाडली; सिनेमॅटोग्राफर ठार, दिग्दर्शक जखमी
पोलिसांनी एका हल्लेखोराला बंदूक आणि दारुगोळ्यासह अटक केली आहे. त्याशिवाय, अन्य आरोपींना अटक करण्यासाठी निर्वासित छावणीत छापेमारी सुरू आहे.

बांगलादेशमधील कॉक्सबाजारमध्ये जगातील सर्वात मोठी रोहिंग्या निर्वासित छावणी आहे. या ठिकाणी जवळपास १० लाख रोहिंग्या आहेत. हे रोहिंग्या मुस्लिम सन २०१७ मध्ये म्यानमारमधून पळून आले होते. म्यानमारमधील लष्कराने रोहिंग्या मुस्लिमांविरोधात कारवाई केली होती. त्यानंतर अनेक रोहिंग्या मुस्लिमांनी प्राण वाचवण्यासाठी इतर देशांमध्ये आश्रय घेतला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: