७० हजार कोटींचा घोटाळा करूनही अजित पवार यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले : खा.ओमराजे निंबाळकर

७० हजार कोटींचा घोटाळा करूनही अजित पवार यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले : खा.ओमराजे निंबाळकर

जनतेच्या पुण्याईवर अभिजीत पाटील विजय होतील : खासदार ओमराजे निंबाळकर

राजाभाऊ चवरे,कुर्मदास कारखान्याचे माजी संचालक हिंदुराव आरे,अमरसिंह साठे व जामगावचे सरपंच सोनाली सरवदे, बुद्रुक वाडीचे सरपंच पूजा माने यांनी जाहीर प्रवेश करून पाठिंबा दिला

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/११/२०२४- माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ मानेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की पंतप्रधानांनी अजित पवार यांना कारवाई करण्याचा इशारा दिला होता.मात्र त्यांनी सरकारला पाठिंबा दिल्या नंतर त्यांना थेट उपमुख्यमंत्री करून अर्थ खाते देण्यात आलं.७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजितदादांना जर पंतप्रधान कारवाई करणार असे म्हणत असताना त्यांना उपमुख्यमंत्री करत असतील तर कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपा सूडबुद्धीने कारवाई करत आहे.पक्ष फोडीचे राजकारण केले.मराठा समाज शांततेत आंदोलन करत असताना लाठी चार्ज केला.आता ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे याला माझे एकच उत्तर आहे. जुडेंगे तो जितेंगे असे म्हणत त्यांनी मोदी पंतप्रधान असताना हिंदू खतरे मे कसा असावा उपस्थित केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जीएसटी लावला जातो मात्र धन दांडग्यांना सूट दिली जाते.शेतमालाला भाव का मिळत नाही असा सवाल उपस्थित केला.

यावेळी त्यांनी मतदार उमेदवारांची तुलना करत असतो. दडपशाहीचे राजकारण लोकांना मान्य नसते.राजकारणात कामाची स्पर्धा महत्त्वाची असते त्याच पद्धतीने अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखाना शेवटच्या घटका मोजत असताना तो चांगल्या पद्धतीने सुरू करून शेतकऱ्यांना चांगला दर दिला. कोरोनाच्या महामारीत आर्थिक नुकसान करून घेऊन नागरिकांचा जीव वाचवला हीच पुण्याई त्यांना निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी अभिजीत पाटील उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की; अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे पूर्ण करून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून द्यावे.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की आबांना उमेदवारी कशी मिळाली हा प्रश्न अनेकांना पडला होता मात्र प्रस्थापितांनी शेकडो तरुणांच्या उताऱ्यावर कर्ज काढून त्यांचे भविष्य उध्वस्त केले.त्यांच्या अश्रूंच्या हुंकरामधून आबांना उमेदवारी मिळाली आहे.पांढऱ्या शुभ्र कापडात गणेश कुलकर्णींचा मृतदेह घरी आला त्यांच्या लहान मुलांच्या हंबरड्यामधून आबांची उमेदवारी आली आहे अशा शब्दात विद्यमान आमदारांचा समाचार घेतला.

यावेळी माढा सकल मराठा समाज आणि जिल्हा दुध संघाचे संचालक व माढा नगरपंचायत नगरसेवक राजाभाऊ चवरे तसेच कुर्मदास साखर कारखान्याचे माजी संचालक हिंदुराव आरे, अमरसिंह साठे व जामगाव विद्यमान सरपंच सोनाली हरिदास सरवदे,हरिदास नागनाथ सरवदे,बुद्रुकवाडीचे विद्यमान सरपंच पूजा गणेश माने यांनी अभिजीत पाटील यांना शेकडो कार्यकर्त्यांसह अभिजीत पाटील यांना पाठिंबा दिला.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe