लसीकरणासाठी पात्र सर्व नागरिकांची नोंदणी करुन घ्यावी – नगरसेवक विवेक परदेशी

लसीकरणासाठी पात्र सर्व नागरिकांची नोंदणी करुन घ्यावी – विवेक परदेशी नगरसेवक, नगरपरिषद पंढरपूर All eligible citizens should be registered for vaccination – Vivek Pardeshi Corporator, Nagar Parishad Pandharpur
पंढरपूर -लसीकरण नेमके कोणास द्यायचे आहे ही यादी तयार असल्यामुळे पंढरपूरात लसीकरणाचा कार्यक्रम खूप चांगल्याप्रकारे पार पडत आहे. या नियोजनामधून आपणास एक गोष्ट लक्षात आली,लसीकरणाची नोंदणी व लसीकरण सेंटर हे एक राहिल्यास गर्दी होऊ शकते, सुरक्षित अंतर न राखल्यास धोका निर्माण होऊ शकतो. सदरच्या आलेल्या अनुभवाचा फायदा घेत यापुढेही आपण असेच नियोजन करायला हवे,आणि आपण तसे करुयात.
लसीकरण केंद्र व लसीकरण नोंदणी केंद्र हे वेगवेगळ्या ठिकाणीच असावेत
     सरकारने दिलेल्या परवानगीनुसार सर्व पात्र नागरिकांची,जेष्ठ नागरिकांची नोंदणी करुन घेऊ यात जेणेकरुन लसी मुबलक उपलब्ध झाल्यास मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम पार पाडता येइल. शिवाय आपण प्रभाग तसेच वार्डाप्रमाणे लसीकरणाचे नियोजन करु शकतो. लसीकरणा साठी पात्र नागरिकांची नोंदणी वयानुसार, प्रभाग नुसार, कोमॉरबीड नुसार, प्रथम द्वितीय डोस नुसार करुन घेतली पाहिजे. आवश्यकतेनुसार सदर माहितीचा वापर करता येईल. जशा जशा लसी उपलब्ध होतील त्या त्या प्रमाणे नागरिकांची यादी तयार असल्याने शासनाच्या सूचनेप्रमाणे आपणास सुरक्षित अंतर ठेऊन, नियोजनबद्ध लसीकरण करणे सोपे जाईल. ज्या नागरिकांना शक्य आहे त्यांच्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी असावी. नोंदणी झाल्यानंतर नागरिकांना कन्फर्मेशन मेसेज यावा. ज्या नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही अशा नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सोडून इतर कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी ऑफलाइन नोंदणीची व्यवस्था असावी.
मुबलक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास वार्डाप्रमाणे लसीकरणाचे नियोजन आखण्यात यावे
 पंढरपूरामधील जवळपास ३७०० नागरिकांच्या दुसऱ्या डोस संदर्भात यादी तयार करुन नियोजन केले आहे. नियोजित यादीमधील काही नागरिक काही समस्यांमुळे किंवा कोरोनामध्ये आणि कोरोनामुक्त झाल्यावर काही दिवस लस घेऊ नका असे डॉक्टर सांगतात त्यामुळे असे नागरिक लस घेऊ शकत नाहीत. ही शक्यता गृहीत धरून लिस्ट मधीलच पुढील नागरिकांना बोलवण्याची यंत्रणा असावी. जेणेकरून उपलब्ध लस वाया जाणार नाही आणि त्यानंतर डॉक्टरांचे व शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सदर व्यक्तींना नियोजीत कालावधी संपल्यानंतर लसीकरण करण्यात यावे.

     आपल्याच गावातील काही नागरिकांनी पंढरपूर शहराजवळील गावातील शासनाच्या अधिकृत लसीकरण केद्रांमध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे. सदर नागरिकांना लसीकरणाचा दुसरा डोस नेमके कोठे मिळणार याची निश्चित माहिती मिळाली नाही. अशा नागरिकांची लिस्ट बनवून जास्त लस मागवून पंढरपूरमध्ये लवकरच स्वतंत्र लसीकरण करण्यात यावे किंवा लगतच्या ज्या गावात लसीचा पहिला डोस घेतला आहे त्याच गावामध्ये लसीकरणाचा दुसरा डोस वेळेतच नियोजन पध्दतीने त्यांना मिळावा. 

     जिल्हाबंदी असल्याने काही नागरिकांनी पर जिल्ह्यात लसीचा पहिला डोस घेतला पण आता ते आपल्या घरी पंढरपूरात आहेत त्यांच्यासाठीही लसीकरणाचे नियोजन आखण्यात यावे. तसेच काही तांत्रिक समस्यामुळे काही नागरिकांना दुसरा डोस रजीस्ट्रेशन होत नाही.त्यांचेही रजिस्ट्रेशन तज्ञ कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात अशी मागणी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, प्रांत अधिकारी सचीन ढोले,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांच्याकडे नगरसेवक विवेक परदेशी यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: