akhilesh yadav news: अखिलेश यादव यांची मोठी घोषणा, ‘आगामी यूपी विधानसभा निवडणूक लढवणार नाही’


लखनऊः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव ( akhilesh yadav) यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. अखिलेश यादव यांनी आपण उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निडवणुकीच्या मैदानात उतरणार नाही, असं अखिलेश यादव यांनी स्वतः घोषित केलं आहे. वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

‘उत्तर प्रदेशची आगामी विधानसभा निवडणूक मी स्वत: लढणार नाही. राष्ट्रीय लोकदलासोबत युती करून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. दोन्ही पक्षातील जागावाटप निश्चित झाले आहे, असं अखिलेश यादव यांनी सांगितलं. विशेष म्हणजे अखिलेश यादव हे सध्या आझमगड मतदारसंघातून खासदार आहेत.

काका शिवपाल यादव यांच्याशी युती करण्याच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. ‘आपल्याला त्यांच्यासोबत यायला काहीच हरकत नाही. त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना योग्य सन्मान दिला जाईल, असं अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं. अखिलेश यादव हे गेल्या वेळी विधानपरिषदेचे आमदार होऊन मुख्यमंत्रीही झाले होते.

congress targets prashant kishor : काँग्रेस प्रशांत किशोरांवर बरसली, ‘आधी स्वतः काय ते ठरवा… मग भाषणबाजी करा’

amit shah’s master plan to win up elections : अमित शहांचा यूपी निवडणुकीसाठी मास्टर प्लान! १२५ आमदारांचे तिकीट कपले जाणार?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: