जनतेच्या सुखदुःखात मी कायम तुमच्या सोबत, अडचणींच्या प्रसंगात कधीही मला संपर्क करा मी तुमच्याकडे हजर असेन – धैर्यशिल मोहिते पाटील

जनतेच्या सुखदुःखात मी कायम तुमच्या सोबत अडचणींच्या प्रसंगात कधीही मला फोन करा संपर्क करा मी तुमच्याकडे हजर असेन -धैर्यशिल मोहिते पाटील

दहिवडी जि.सातारा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०४/२०२४- माढा लोकसभा मतदारसंघातील दहिवडी येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली.

माण खटाव तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखात मी कायम तुमच्या सोबत आहे. अडचणींच्या प्रसंगात कधीही मला फोन करा संपर्क करा मी तुमच्याकडे हजर असेन असा शब्द देतो व तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून तुमची सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो असे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली.

या मतदारसंघामध्ये अतिशय चांगला एक उमदा तरूण धैर्यशील मोहिते पाटलांच्या रुपाने तुम्हा सर्वांच्या समोर या निवडणुकीला उमेदवार म्हणून सादर केला आहे. त्यांची ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ही खूण आहे. त्याच्या समोरचं बटण दाबा आणि मोठ्या मतांनी त्यांना लोकसभेत पाठवा असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले.

यावेळेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर,आ.जयंत पाटील,प्रभाकर देशमुख, सुनिल माने,उत्तम जानकर,सुभाष नरळे, रवींद्र पाटील,रणजित देशमुख,अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे,अभयसिंह जगताप, नंदकुमार मोरे,अर्जुन खाडे,संदीप मांडवे, शिवसेना (उ.बा.ठा) जिल्हाध्यक्ष संजय भोसले,श्रीराम पाटील,एम के भोसले, दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ,सुनील पोळ,तानाजी कट्टे, कविता ताई म्हेत्रे,नितीन राजगे,कॅप्टन बंडू कोकरे, अनुराधाताई देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *