पर्यटनामध्ये सेवा आणि मूल्य सुसंगत असले पाहिजे-अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर

पर्यटनामध्ये सेवा आणि मूल्य सुसंगत असले पाहिजे-अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13- पर्यटनामध्ये सेवा आणि मूल्य सुसंगत असले पाहिजे.यामुळे पर्यटकांना आनंद मिळून पर्यटन केंदाला उत्पन्न मिळण्यास मदत होते असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले.पर्यटन संचलनालय, पुणे, असेन्सिव्ह एज्युकेअर लि.(राष्ट्रीय कौशल्य विकास यंत्रणा) यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र येथे मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

निवासी जिल्हाधिकारी मनिषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड या प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते.अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर म्हणाल्या, कृषी पर्यटन ही एक उद्योन्मुख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संकल्पना आहे. कृषी पर्यटनामुळे नवीन अर्थजनाच्या संधी निर्माण होत आहेत. ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. गावाला व शेतीला नवी ओळख करून देणारी संकल्पना म्हणून कृषी पर्यटन राज्यासह देशात विस्तारत आहे.चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र चालवत असताना यापूर्वी प्रशिक्षण न घेताही चिंचणी येथील कृषी पर्यटन केंद्र अतिशय उत्तम चालवून एक आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.

निवासी जिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन महिला व पुरुषांना प्रशिक्षित करणे आवश्यक असल्यामुळे हा कार्यक्रम व्हिसा यांनी आयोजित केला आहे.या प्रशिक्षणामध्ये 40 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला असून हे प्रशिक्षण शनिवार दि.15 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरु राहणार आहे.

सदर प्रशिक्षण पर्यटन आणि आदरातिथ्य कौशल्य या आदीबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.यामधून पर्यटकां सोबत संवाद, आदरातिथ्य, स्वागत, काळजी घेणे आदीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षण देण्यासाठी जनरल मॅनेजर सूर्या मुखर्जी व सत्यजित हे वरीष्ठ प्रशिक्षक पाच दिवस प्रशिक्षण देणार असून पाचव्या दिवशी परीक्षा घेवून  प्रशिक्षणात सहभाग घेतलेल्या महिला व पुरुषांना प्रशस्तीपत्र दिले जाणार आहेत.

Leave a Reply

Back To Top