पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच गुडघ्याची यशस्वी मोफत शस्त्रक्रिया
पंढरपूर ,दि.04 :-उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे प्रथमच दुर्बिणीद्वारे संदेश कांबळे पंढरपूर या रुग्णावर तुटलेल्या गुडघ्याच्या शिरांची दुर्मिळ आणि गुंतागुंतीची असणारी शस्त्रक्रिया सोलापूरचे आर्थ्रोस्कोपी तज्ञ डॉ.विवेक देगावकर यांनी केल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेशकुमार सुडके यांनी दिली.

महात्मा जन आरोग्य योजनेअंतर्गत गुडघ्याच्या शिरांची मोफत शत्रक्रिया यशस्वीरित्या भूलतज्ञ डॉ अभिजित पाटील यांच्या सहाय्याने पार पडली .सदरची शस्त्रक्रिया जिल्हाशल्याचित्सक डॉ सुहास माने ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय डॉ महेश कुमार सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एमजीपीजे टीम उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या प्रयत्नाने यशस्वी झाली.

अशा प्रकारचे आजार असणाऱ्या रुग्णांनी या मोफत शत्रक्रियांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश कुमार सुडके यांनी दिली केले आहे.