पंढरपूर डाक विभागात सहा नवीन शाखा डाकघर सुरू : ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा

पंढरपूर डाक postal news विभागात सहा नवीन शाखा डाकघर सुरू : ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा

पंढरपूर डाक विभागांतर्गत पंढरपूर, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला तालुक्यात सहा नवीन शाखा डाकघरे सुरू; ग्रामीण सेवांना बळकटी.

Maharashtra Postal News पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर डाक विभागा मध्ये ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून पंढरपूर, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला तालुक्यातील एकूण सहा ठिकाणी नवीन शाखा डाकघर कार्यालये सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक यांनी दिली.

करमाळा तालुक्यातील आळजापूर व हिवरे,माढा तालुक्यातील गवळेवाडी, पंढरपूर तालुक्यातील करोळे, माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी तसेच सांगोला तालुक्यातील सोनलवाडी येथे नव्याने सुरू झालेल्या शाखा डाकघर कार्यालयांचा उद्घाटन समारंभ खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी आमदार नारायण आबा पाटील, आमदार उत्तमराव जानकर, संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमास पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक मुन्ना कुमार,सहाय्यक अधीक्षक एम.एम.पाटील, करमाळा उपविभागीय डाक निरीक्षक लक्ष्मण शेवाळे, जनतक्रार निवारण अधिकारी राजेश शर्मा, उपविभागीय डाक निरीक्षक योगेश चीतमुगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीन शाखा डाकघर सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय झाली असून, डाक विभागाच्या विविध बचत योजना, विमा योजना, आधार सेवा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना गावातच मिळणार आहे.

ग्रामीण जनतेने या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यावेळी केले. गावात नवीन पोस्ट ऑफिस सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Back To Top