राष्ट्रीय लोकअदालतध्ये ८७७ प्रकरणे निकाली


७३ कोटी २५ लाख ६४ हजार ९०२ रुपयांची तडजोड शुल्क वसूल

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०५/२०२५ – तालुका विधी सेवा समिती पंढरपूर यांच्या वतीने जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे दि.१० मे २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

या लोकअदालतीमध्ये एकुण ८७७ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली.या प्रकरणा मध्ये एकूण ७३ कोटी २५ लाख ६४ हजार ९०२ रुपयांची तडजोड शुल्क वसूल झाले तसेच ५ वर्षावरील जुनी एकुण ७९७ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली असल्याची माहिती डि.एन.सुरवसे अध्यक्ष तालुका विधीसेवा समिती पंढरपूर तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश पंढरपूर यांनी दिली.

या लोकअदालतीसाठी एकुण ७ पॅनलची व १ नियमित न्यायालयाची व्यवस्था करण्यात आली होती.सदरच्या पॅनल मध्ये तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस.बी.देसाई,न्यायाधीश श्रीमती एस.एस.पाखले,ए.ए.खंडाळे,एन.एस.बुद्रुक, श्रीमती एस.एस. राऊळ,श्रीमती के.जे. खोमणे,पी.पी.बागुल,श्रीमती पी.आर. पाटील यांनी काम पाहिले.
सदरची लोकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती.त्यासाठी डी.एन.सुरवसे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश तसेच श्रीमती एस.एस. पाखले, दिवाणी न्यायाधीश व.स्तर, पंढरपूर, ए.ए.खंडाळे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, पंढरपूर व एन.एस.बुद्रुक, २रे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर पंढरपूर यांनी वेळोवेळी बैठका घेवुन, पाठपुरावा करुन संपन्न केली.
या लोकअदालतीस विधीज्ञ,बैंक कर्मचारी, महावितरणचे अधिकारी,पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते व त्यांचे सर्वांचे सहकार्याने सदरचे लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.

