पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई मिळावी- कल्याण काळे यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०५/२०२५ – पंढरपूर तालुक्यात सध्या हवामानातील बदलामुळे अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊसामुळे फळबागा व पिकांचे नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच 2024 मध्ये गारपीट झालेल्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचेकडे केली.
या निवेदनाची दखल घेत पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशा सुचना संबंधीत विभागाकडे देण्यात आल्या.
राज्याचे कृषी मंत्री पंढरपूर श्री विठठल रुक्मिणी दर्शनाकरीता आले असता कल्याणराव काळे जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.त्यावेळी त्यांचा सत्कार सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी पंढरपूर तालुक्यात सध्या हवामानातील बदलामुळे अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे केळी, शेवगा, ऊस, द्राक्ष, आंबा व खरीप हंगामाची पिके भुईमुग, मका, बाजरी, इ. पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडलेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या फळबागांचे त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी तसेच लिंकींग खत देणे बंद व्हावे. पंढरपूर तालुक्यात माहे मे 2024 मध्ये अवकाळी पावसामुळे व गारपीठ यामुळे झालेल्या शेतपिकांचे व फळपिकांची नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शासनाकडून प्राप्त झालेली नाही ती जमा व्हावी व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – 2023-24 – 1.36 कोटी, 2024-25- 1.35 कोटी, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – 2023-24- 4.88 कोटी 2024-25 – 6.99 कोटी, व महात्मा गांधी रोजगार हमी योजना – 2023-24-49 लाख रूपये. इ. योजनेचे अनुदान प्रलंबित आहे तरी शेतकऱ्यांच्या खातेवर जमा व्हावेत अशी मागणी काळे यांनी निवेदनात केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक, शहराध्यक्ष दिगंबर सुडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण शिंदे, अर्जुन जाधव,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, संचालक मोहन नागटिळक, राजुबापू पाटील,अमोल माने, सुरेश देठे, दिनकर कदम, विक्रम बागल, अरुण नलवडे, राजाभाऊ माने, बाळू माने, जयसिंह देशमुख, शंकर चव्हाण महाराज, परमेश्वर लामकाने,ज्योतीराम पोरे,सुभाष बागल, तुकाराम झांबरे,महादेव देठे,बाळू शिंदे, अंकुश चव्हाण,योगेश जाधव,सचिन पवार सी.पी.बागल, सतिश नागणे,नारायण कदम यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.


