लायसन्सड इंजिनीअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी इंजि.सारंग कोळी यांची निवड
सचिवपदी इंजिनियर सोमनाथ काळे,उपाध्यक्षपदी इंजिनीयर राजकुमार आटकळे
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – लायसन्सड इंजिनीअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी इंजि.सारंग कोळी आणि सचिवपदी इंजि. सोमनाथ काळे यांची निवड करण्यात आली. यावेळी असोसिएशनचा पदग्रहण समारंभ करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वेरी कॉलेजचे अध्यक्ष इंजिनिअर दादासाहेब रोंगे हे होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे व प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.कैलास करांडे यांच्या हस्ते इंजिनिअर सारंग कोळी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी सचिव पदी इंजिनियर सोमनाथ काळे, उपाध्यक्षपदी इंजिनीयर राजकुमार आटकळे, सहसचिव पदी इंजिनियर ललित कुमार पाटील, खजिनदारपदी इंजिनिअर सचिन माळवदे,कार्यकारणी सदस्यपदी इंजिनियर संतोष कचरे,इंजिनियर संतोष रोपळकर, आर्किटेक्ट बाळ कुंभार ,आर्किटेक्ट यतिन गांधी, इंजिनियर ज्ञानेश्वर कोले,इंजिनीयर प्रवीण जगताप यांची नियुक्ती करण्यात आली.

मोबाईलच्या काळात मैत्री आणि संघटन ही काळाची गरज आहे. मोबाईल मुळे मैत्रीतील संभाषण कमी होत चालले आहे त्यामुळे येणाऱ्या पिढीसमोर मैत्री,मित्र प्रेम, मित्रातील वाद ,भांडण , पुन्हा एकत्र येऊन हसणे फिरणे दुर्मिळ होते की काय असे वाटते आहे. त्यामुळे अशा संघटनांची आज गरज भासते आहे आपले काम खरोखरच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.कैलास करांडे सर यांनी केले.
आजकाल समाजासाठी खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या संघटना व आंदोलनं कमी होताना दिसत आहेत .आपण या असोसिएशनच्या माध्यमातून इंजिनियर्स बांधवांचे प्रश्न घेऊन काम करत आहात. तसेच ग्रीन बिल्डिंग च्या माध्यमातून समाज उपयोगी पर्यावरण पूरक बांधकाम करीत आहात त्याबद्दल सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनिअर दादासाहेब रोंगे यांनी केले.

नूतन अध्यक्ष इंजिनिअर सारंग कोळी यांनी मनोगत व्यक्त करताना इंजिनिअरच्या नगरपालिका तसेच बांधकाम साइटवर येणाऱ्या अडीअडचणी संबंधी तसेच काम करताना होणारी आर्थिक तारांबळ, कामगारांची अनियमितता त्यामुळे वाढणारा मानसिक तणाव याचा आढावा घेतला. ही संघटना बांधकाम व्यवसायिकांंना सोबत घेऊन व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.मार्केटमध्ये असणाऱ्या कंपन्यां कडून वेळोवेळी नवीन नॉलेज अपडेट करण्यासाठी कंपनी मीटिंग व कंपनी विजिट उपलब्ध करून देत आहे.
हा पदग्रहणाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीकडून सहकार्य लाभले.या कार्यक्रमास अल्ट्राटेक चे टेक्निकल मॅनेजर इंजिनीयर राजेश कांबळे सेल्स मॅनेजर संदीप कदम, सेल्स अधिकारी राकेश पाटील,आर एम सी प्लांटचे इंजिनियर शेख साहेब व इंजिनियर सुहास वसेकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी अल्ट्राटेक कंपनी कडून सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी इंजिनिअर राजेश कांबळे व इंजिनिअर श्री. शेख यांनी कंपनीचे प्रेझेंटेशन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनिअर जितू बत्रा यांनी केले.आभार प्रदर्शन सोमनाथ काळे यांनी केले.
