श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर – सोशल मिडियावरची आध्यात्मिक वाटचाल
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर हे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या पुण्यभूमीच्या सेवेत कार्यरत असलेली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,पंढरपूर ही संस्थानिक अधिकृत संस्था आपल्या परंपरेप्रमाणे भाविकांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या माध्यमांतून कार्यरत आहे. त्यातीलच एक आधुनिक साधन म्हणजे Instagram अकाऊंट ज्याने गेल्या काही वर्षांत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
अकाऊंटची सुरुवात 2021 आणि 2024 पर्यंतचा प्रवास
श्री मंदिर समितीने Instagram वर आपले अधिकृत पेज @vitthalrukminimandir_official या नावाने सुरू केले, त्यामागे मुख्य उद्देश होता
देवस्थानाच्या उपक्रमांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे
वारी, उत्सव,सेवा,सुविधा,अपडेट्स या सर्व गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज भाविकांपर्यंत पोहोचवणे

सुरुवातीला काही हजार फॉलोअर्सपासून या अकाऊंटने आपला प्रवास सुरू केला. नियमित अपडेट्स, दर्जेदार फोटो/व्हिडीओ, कार्यक्रमांचे Live अपडेट्स,भाविकांच्या अनुभवाचे दर्शन या सर्वांमुळे 2024 च्या अखेरीस हे अकाऊंट सुमारे 66 K फॉलोअर्स पर्यंत पोहोचले होते.
2025 मध्ये झालेली लक्षणीय वाढ :
2025 मध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर व भाविकांसाठी डिजिटल सेवा व सुविधा (जसे की टोकन दर्शन प्रणाली, QR अॅप लिंक, अधिकृत वेबसाइट, Facebook पेज लिंक इ.) यामध्ये मोठा सुधारणा करण्यात आली. याचाच सकारात्मक परिणाम Instagram वर दिसून आला.
नियमित reels, stories आणि भक्तांच्या भावना मांडणारी पोस्ट्स
देवदर्शन Live कार्यक्रम
अधिकृत अॅपचे QR कोड highlight मध्ये देऊन लोकांना सुविधा उपलब्ध करून देणे
डिझाइन केलेले पोस्ट्स व कार्यक्रम सूचना.
या सर्व गोष्टींमुळे अकाऊंटने अल्प कालावधीत 2.51 लाख (251K) फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला.
आकडेवारीनुसार यश
1.5 कोटी व्यूज (गेल्या 30 दिवसांत) — Instagram वरचे हे एक मोठे यश.
0 Following असूनही फक्त शुद्ध भक्तिमय व आध्यात्मिक सामग्रीच्या जोरावर प्रचंड पोहोच.
यशामागचं कारण
सतत अपडेट्स ,आधुनिक माध्यमांचा समन्वय, पारदर्शक, अधिकृत माहिती,Digital भक्तीचे सुंदर दर्शन.सह अध्यक्ष सर्व समिती सदस्य, कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक विभागाचे नियोजन
अधिक माहितीसाठी आजच फॉलो करा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर खाते
https://www.instagram.com/vitthalrukminimandir_official

