वीर धरणातून विसर्गाबाबत महत्त्वाची सूचना
वीर प्रकल्प ता.पुरंदर,जि.पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ होत आहे.पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार आज दि.24/06/2025 सकाळी 11.00 वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे 13911 cusecs विसर्ग व विद्युतगृहाद्वारे 1500 cusecs विसर्ग असा एकूण 15411 cusecs विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात येणार आहे.

पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये आवश्यक तो बदल करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी अशी माहिती देत आवाहन करण्यात आले आहे की कृपया नदी पात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील असे नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता फलटण यांनी कळवले आहे.
