विठ्ठल विठ्ठल म्हणत चला

विठ्ठल विठ्ठल म्हणत चला

विठ्ठल विठ्ठल म्हणत चला
चला जाऊ पंढरी दर्शनाला
ऊन, वारा, थंडी पाऊस
यांचा सोसावा थोडा त्रास
वारीचा सोहळा पाहायला
चला जाऊ पंढरी दर्शनाला ll 1ll
पहा पंढरी कशी सजली
रुक्मिणी माता कशी नटली
संसार थोडा ठेवा बाजूला
चला जाऊ पंढरी दर्शनाला ll 2ll
श्री हरीचा सुगंध अणु रेणूत
सामर्थ आहे हरीनामात
वारकरी पाहता श्री हरी हसला
चला जाऊ पंढरी दर्शनाला ll 3ll
तुळशी माळा माझ्या गळ्यात
पांडुरंग वसे माझ्या हदयात
शेंगा लाडू चा नैवेद्य विठ्ठलाला
चला जाऊ पंढरी दर्शनाला ll4ll
भगवा झेंडा माझ्या खांद्यावर
बुक्का केशरी गंध कपाळावर
चला चंद्रभागेत जाऊ स्नाना ला
चला जाऊ पंढरी दर्शनाला ll5ll
संत भेटीसाठी मन आतुर झाले
दुःख सारे विसरून गेले
चला भजन किर्तन प्रवचन एई का याला
चला जाऊ पंढरी दर्शनाला ll6ll
ज्ञानेश्वरी, तुकोबा गाथा झोळीत आहे
या शिदोरी वर मी जगत आहे
मागणे ना काही श्री हरीला
चला जाऊ पंढरी दर्शनाला ll7ll

लेखक कवी डॉ.जगदीश चंद्र कुलकर्णी सोलापूर ..

Leave a Reply

Back To Top