पोलीस आणि पत्रकारांमध्ये समन्वय असणे गरजेचे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांचे प्रतिपादन
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असणारे सदर बझार पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून असून पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन मिठाई भरवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे,जिल्हा संघटक सादिक शेख,शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी,दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद,अमोल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर म्हणाले की पोलीस आणि पत्रकार हे दोन्ही घटक समाजातील मुख्य व प्रमुख घटक आहेत त्यामुळे पोलीस आणि पत्रकार यांनी आपापसात समन्वय साधून काम केले तर समाजात घडणाऱ्या घटनांना उत्तम पद्धतीने हाताळता येतील आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात चांगले यश मिळेल.पत्रकार हा एक शासन आणि जनतेमधील दुवा असून पत्रकारांनी आपले काम योग्य व पूर्णपणे चोख बजावले पाहिजे असे देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर म्हणाले.
पदभार घेतल्यानंतर पत्रकार सुरक्षा समितीने केलेल्या सत्काराला उत्तर देत ते म्हणाले, माझ्या हद्दीत कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी वाढू देणार नाही,कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडू देणार नाही.सर्वांना सोबत घेऊन काम करू आणि कामाचा आनंद सर्वांनी देऊ अशी भावना व्यक्त केली.

