मायभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांसाठी रक्तदान
शिवसेना पक्षाच्यावतीने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केले सिंदुर महारक्तदान शिबिर

जम्मू /ज्ञानप्रवाह न्यूज | शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या सिंदुर महारक्तदान शिबिरा चा सांगता सोहळा जम्मू येथील एम्स रुग्णालयाच्या सभागृहात पार पडला. या रक्तदान यात्रेत सहभागी झालेल्या सर्व रक्तदाता यात्रेकरूंचे आवर्जून कौतुक करून त्यांचे आभार मानले.

जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते त्यावेळी सगळ्यात आधी श्रीनगर येथील भारतीय सैन्यदलाच्या ९२ बेस हॉस्पिटलला भेट देऊन सिंदूर महारक्तदान यात्रेत सहभागी झाले.

हे रक्तदान आपण सर्वांनी देशासाठी केले, हे रक्तदान आपण सर्वांनी सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांसाठी केले. सुरुवातीला हजार ते बाराशे लोक रक्तदान करणार होते, मात्र प्रत्यक्षात नऊ हजार आठशे लोकांनी नोंदणी करून रक्तदान केले हा इतिहास आहे. पैलवान मंडळी नुसती कुस्ती खेळत नाहीत तर प्रसंगी सीमेवरील जवानांसाठी रक्तदान देखील करतात हा संदेश चंद्रहार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दिला असल्याचे याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

सैन्यातील अधिकारी म्हणाले एवढे मोठे रक्तदान शिबिर पहिल्यांदा आयोजित केले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या निमित्ताने देशाच्या सेनेसाठी शिवसेना पुढे आली आहे. यापुढेही सेनेला जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा रक्तदान करण्यासाठी शिवसेनेचे हे पैलवान सगळ्यात पुढे राहतील असे यावेळी त्यांनी जाहीर केले.
चंद्रहार पाटील यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.त्यांच्या जीवाला जीव देणारे सर्व सहकारी या निमित्ताने पाहायला मिळाले.सांगली येथील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या सिंदूर महारक्तदान यात्रेमध्ये जिल्ह्यातील एक हजार पैलवान प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्यदला बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी रक्तदान करण्याचा निर्धार केला आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ही पहिलीच जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली आहे.भविष्यात ते देशभरातील पैलवानांचे प्रश्नही त्याच प्रामाणिकपणे सोडवतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

आज हवामानामुळे आधी उधमपूर आणि नंतर जम्मूला पोहोचू शकेन असे वाटले नव्हते पण इच्छाशक्ती प्रबळ असल्यानेच ते शक्य झाले असे सांगून या रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःही रक्तदान केले.एवढेच नव्हे तर जे कुणी या रक्तदान शिबिरात सहभागी झालेत त्यांना रक्तवीर पुरस्कार देण्यात येईल असे जाहीर केले. तसेच आजची ही सिंदूर महारक्तदान यात्रा भविष्यात देशव्यापी चळवळ बनेल असा विश्वास याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
या यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होऊन चंद्रहारच्या साथीने त्यांनी स्वतः रक्तदान केले.तसेच भारतीय सैन्य दलाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे देशवासीयांच्यावतीने अभिनंदन करून त्यांचे आभार मानले. तुम्ही इथे दक्ष असता म्हणून आम्ही देशभरात सुखाने राहू शकतो असे सांगत प्रत्येक सैनिकाप्रती कृतज्ञताही व्यक्त केली.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, या यात्रेचे मुख्य आयोजक चंद्रहार पाटील, एम्सचे कार्यकारी संचालक प्रा.शक्तिकुमार गुप्ता, लेफ्टनंट जनरल सुनील कांत, सांगली विटा येथील स्वर्गीय आमदार बाबर साहेबांचे असंख्य कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातून आलेले पैलवान आणि शिवसैनिक उपस्थित होते.


