गायत्री नगरमध्ये ४८ दिवस चालणाऱ्या भक्तामर पाठाचे उद्घाटन
जयपूर / ज्ञानप्रवाह न्युज,१० ऑगस्ट – परमपूज्य आचार्य श्री विद्यासागर जी महाराजांचे परमप्रभावक शिष्य पूज्य मुनी श्री पावनसागर जी महाराज जंगल वाले बाबा, मुनी श्री सुभद्र सागर जी महाराज संघ यांच्या आशीर्वादाने ४८ दिवस चालणाऱ्या या भक्तामर पाठाचे उदघाटन 10 ऑगस्ट 2015 रोजी रात्री 8:00 वाजता दिगंबर जैन मंदिर गायत्री नगर महाराणी फार्म येथे मंदिर व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

अखिल भारतीय दिगंबर जैन युवक परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस उदयभान जैन यांनी सांगितले की, पूज्य मुनी श्री पावनसागर जी महाराज यांनी पहाटेच्या अभिषेक,शांतीधारा नंतर सम्यक दृष्टीवर शुभ प्रवचन दिले.

त्यानंतर 15 चेतना यात्रेकरूंनी मुनीश्रींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.अध्यक्ष कैलास छाबरा यांनी स्वागतपर भाषण केले.

उदयभान जैन यांनी सांगितले की ४८ दिवस चालणाऱ्या भक्तामर पाठाचे हे आठवे वर्ष आहे.समन्वयक अनिता बडजात्या, डॉ. अनिता जैन,विमला जैन,ज्योती जैन यांनी मुनी श्री पावनसागर जी,मुनी श्री सुभद्रसागर जी महाराज यांचे आशीर्वाद घेतले व श्रीफळ अर्पण करून मंगल सानिध्याची विनंती केली.

मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलाश छाबड़ा ,उपाध्याक्ष अरुण शाह,मंत्री राजेश बोहरा, सारसमलजी पदमचन्द झांझरी ,बसंत बाकलीवाल, अशोक पापड़ीवाल, पवन सेठी , लता सोगानी ,सुधा लुहाड़िया,रमेश काला,रेणू बाकलीवाल,जितेंद्र जैन बाकलीवाल,ॲड.विमल जैन,मंजू जैन सेवा वाली,अशोक बडजात्या,अनिल जैन महावीर जी वाले,अशोक रावका,सुनील जैन रावका बयाना वाले, हरकचन्द जी बडजात्या आदींसह समाजातील मान्यवर व महिला-पुरुष उपस्थित होते.

भक्तामर पाठ ऋद्धि सिद्धि मंत्र व दीप अर्चना भक्ति भाव सहित २७ ऑक्टोंबरपर्यंत सुरू राहील.या कार्यक्रमाचेचे सूत्रसंचालन उदयभान जैन यांनी केले.

त्यानंतर रात्री ९ वाजता विधानाचार्य पंडित अजित शास्त्री गायत्रीनगर यांनी सोलह कारण भावनाओं की प्रथम दरश विशुद्ध भावना वर सारगर्भित प्रकाश टाकला.

