जैन सोशल ग्रुप पंढरपूर व सौ कुसुम जिनदत्त शहा वेल्फेअर फौंडेशन यांच्या वतीने रक्तदान व त्वचारोग माफक दरात शस्त्रक्रिया शिबीर

जैन सोशल ग्रुप पंढरपूर आणि सौ कुसुम जिनदत्त शहा वेल्फेअर फौंडेशन यांच्यावतीने रक्तदान व त्वचारोग माफक दरात शस्त्रक्रिया शिबीर

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –स्वातंत्र्य दिनानिमित्त जैन सोशल ग्रुप पंढरपूर आणि सौ कुसुम जिनदत्त शहा वेल्फेअर फौंडेशन बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ता.१५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर आणि ता.१५ व ता.१६ ऑगस्ट रोजी त्वचारोगसंबंधित माफक दरात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान शिबिराचे आयोजन दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०८:३० ते दुपारी ३.०० या वेळेमध्ये करण्यात आले आहे.

तर डॉ.अंकिता शाह MBBS,MD (त्वचारोग तज्ज्ञ) यांचे माफक दरात त्वचारोग शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दि.१५ व १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ०५:०० या वेळेमध्ये करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये मस्से / तीळ / चामखीळ काढणे,चेहऱ्यावरील / शरीरावरील जखमेचे व्रण काढणे ,फाटलेल्या कानाच्या पाळ्याची दुरुस्ती,नाकाचे भोक बुजवणे,पिंपल्सच्या व्रणांसाठी उपचार,कॉर्न्स / वॉर्ट्स, पापण्यांवरील झोळ/ ज़ैंथेलसमा किंवा गाठी (Xanthelasma),सेबेसियस / डर्माईड सिस्ट ,कीलॉईडवर उपचार/ कानावरील कीलॉईडसाठी शस्त्रक्रिया,चरबीची गांठ काढणे /लायपोमा (Lipoma), ओघळलेल्या पापण्यांसाठी/ डोळ्याखालचे बॅग्जसाठी शस्त्रक्रिया,स्थिर कोडाची त्वचेचा रंग भरण्यासाठी शस्त्रक्रिया,त्वचेचा कर्करोग निदान व उपचार,दुखणार्या नखांची अनियमित वाढ  (Ingrown nail surgery) या वरती माफक दरात उपचार केले जाणार आहेत.

फडे नर्सिंग होम लक्ष्मी पथ महावीर नगर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर पंढरपूर येथे या शिबीराचे आयोजन केले असून नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी डॉ राजेश र.फडे पंढरपूर यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.संपर्कासाठी नंबर  9822009780

टीप: सर्व उपचारांची निवड रुग्णाच्या स्थितीवर व त्वचारोग तज्ज्ञांच्या आणि लागणार्या तपासणीनंतर सल्ल्यानुसार केली इजाईल.तपासणी मोफत असणार आहे तर रक्ताची आणि शस्त्रक्रिया माफक दरात करण्यात येईल.

Leave a Reply

Back To Top