सोन्याचे व चांदीचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीकडुन ८,८१,७००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं.४५७/ २०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्ह्यामध्ये एकुण ८,८१,७००/- रू किंमतीचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तु चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यातील साक्षीदार महिला हि फिर्यादीचे राहते घरामध्ये केअर टेकर म्हणुन काम करीत होती.तिने माहिती दिली की, सदर घरामध्ये एक इसम तोंडाला मास्क बांधुन डोक्यावर कॅप घालुन स्पोर्ट मोटारसायकल वरून येवून घरामध्ये घुसुन चोरी केल्याबाबत सांगत होती. त्या अनुषंगाने तपास चालु केला असता या वर्णनाची व्यक्तीबाबत कोठेही व काहीएक पुरावा मिळुन आला नाही तसेच गोपनिय बातमीदार यांचेकडुन वरील वर्णनाच्या आरोपीबाबत काहीएक माहिती मिळुन आला नाही.

हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या उद्देशाने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे पंढरपुर विभाग पंढरपुर यांच्या सुचनेनुसार व पंढरपुर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमून पंढरपूर शहर व परिसरातील त्या ठिकाणचे घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने लक्ष ठेवले असता असे लक्षात आले की फिर्यादीचे राहते घरामध्ये केअर टेकर म्हणून काम करणारी महिला नामे अ.ब.क. हिनेच फिर्यादीचे राहते घरामध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेवुन चोरी केली आहे. त्याअनुषंगाने सदर महिला हिस विश्वासात घेवुन तपास केला तिने गुन्हा केल्याचे कबुल केले व सदर महिलेकडून घरात चोरीला गेलेले सोन्याचे दागिने व चांदीचे वस्तु असा एकुण ८,८०,७००/- रू जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे पंढरपुर उपविभाग पंढरपुर,पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आशिष कांबळे, पोसई राजेश गोसावी,पोह सिरमा गोडसे,पोह विठ्ठल विभुते, पोह प्रसाद औटी, पोह सचिन हेंबाडे,पोकॉ कपिल माने, पोशि शहाजी मंडले,पोकॉ बजरंग बिचुकले, पोकॉ दिपक नवले, पोकॉ धनाजी मुटकुळे तसेच सायबर पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण चे पोकॉ रतन जाधव यांनी केली आहे.



