श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथे गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्तीची स्थापना

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्तीची स्थापना

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०८/२०२५ – आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.या मंगल प्रसंगी समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते गणेश पूजन व स्थापना विधी संपन्न झाला.

गणेश पूजनावेळी समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच मंदिरे समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार व धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडला.

समितीच्यावतीने गणेशोत्सवाच्या या पावन पर्वानिमित्त सर्व भाविक भक्त मंडळींना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.श्री गणरायांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख,शांती व समृद्धी नांदो,अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

गणेशोत्सव काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Back To Top